शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटकर ठाण्यावर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST

हिंगणघाट शहराचे हृदयस्थान असलेल्या नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात जात असलेल्या एका प्राध्यापिकेला आरोपी विकेश नगराळे याने वाटेत अडविले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने स्वत: जवळील पेट्रोल त्या प्राध्यापिकेच्या अंगावर टाकून तिला आगीच्या हवाली केले. या घटनेत पीडिता ही सुमारे ४० टक्के भाजली गेली.

ठळक मुद्देआरोपीला फाशी द्या : मोर्चा काढून नोंदविला निषेध, खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या प्राध्यापिकेला हिंगणघाट शहरात पेट्रोल टाकून आगीच्या हवाली करीत जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न विकेश नगराळे नामक इलेक्ट्रीशीयनने केला. या प्रकरणातील आरोपील हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असली तरी त्याने केलेले कृत्य निंदनिय आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हिंगणघाटकरांनी एकत्र येत मोर्चा काढून हिंगणघाट पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदार सत्यजीत बंडीवार यांना सादर करण्यात आले.हिंगणघाट शहराचे हृदयस्थान असलेल्या नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात जात असलेल्या एका प्राध्यापिकेला आरोपी विकेश नगराळे याने वाटेत अडविले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने स्वत: जवळील पेट्रोल त्या प्राध्यापिकेच्या अंगावर टाकून तिला आगीच्या हवाली केले. या घटनेत पीडिता ही सुमारे ४० टक्के भाजली गेली. पीडितेला आगीच्या हवाली केल्यानंतर घटनास्थळावरून यशस्वी पळ काढणाऱ्या आरोपी विकेश नगराळे याला हिंगणघाट पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. परंतु, त्याने केलेले हे कृत्यू माणुसकीलाच लाजवेल असे असल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ठाणेदारांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मोर्चाच्या माध्यमातून विकृत मानसिकतेचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला. शिवाय हैद्राबाद येथील घटनेतील आरोपीचा जसा एन्काऊंटर करण्यात आला तसाच याही आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी रेटली. या आंदोलनाचे नेतृत्त्व मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. मोर्चात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अत्याचारमुक्ती संघर्ष समितीचे एसडीओंना साकडेहिंगणघाट येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विदर्भ प्रदेश जेष्ठ नागरिक व निराधारांचे अत्याचारमुक्ती संघर्ष समितीच्यावतीने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आशा कापटे, नलीनी महाजन, सुमन खाटे, कमला पाथर, इंदिरा पर्बत, सुनंदा भोयर, सुमन धाबर्डे, गीता कोटकर, शेषराव लोणकर, तुकाराम कोल्हे, गुड्डु शर्मा, विद्या गिरी, दागिणी गिरी, मंगला वंजारी, रागिणी शेंडे आदींची उपस्थिती होती.जखमीचे बयाण नोंदविण्यात अडचणया प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद केले आहे. शिवाय गंभीर जखमी प्राध्यापिकेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमीची प्रकृती अजूनही स्थिर झाली नसल्याने पोलिसांनाही तिचे बयाण नोंदविण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत जखमीचे बयाण नोंदविण्यात आले नव्हते.

टॅग्स :Policeपोलिस