ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर व मेळावा

By Admin | Updated: October 17, 2015 02:55 IST2015-10-17T02:55:55+5:302015-10-17T02:55:55+5:30

येथील संकल्प ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने स्थानिक माहेर मंगल कार्यालयात तीन दिवसीय सामाजिक, ...

Health Camp for Youth and Meetings | ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर व मेळावा

ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर व मेळावा

सामाजिक उपक्रम : संकल्प ज्येष्ठ नागरिक समिती
सेलू : येथील संकल्प ज्येष्ठ नागरिक समितीच्या वतीने स्थानिक माहेर मंगल कार्यालयात तीन दिवसीय सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक व आरोग्य विषयक शिबिर तसेच आनंद मेळावा घेण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक व समाज सेवक मोतीलालजी जयस्वाल यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले.
पहिल्या दिवशी श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायांकडून आध्यात्मिक योग शिबिर घेण्यात आले. प्रशिक्षक बालपांडे, पुनम पांडे, व्यास, किरण वाघमारे व त्यांच्या सहकार्याकडून योगाचे धडे ज्येष्ठांना देण्यात आले. प्रकाश महाराज वाघ व त्यांच्या संचाने समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला.
यावेळी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात कस्तुरबा मेडिकल कॉलेज सेवाग्रामच्या चाळीस डॉक्टरांच्या चमूने उपस्थित राहून विविध आजाराचे निदान केले. रात्रीला सुरगाव येथील सप्त खंजेरीवादक व राष्ट्रसंताच्या विचाराचे प्रचारक प्रवीण देशमुख यांचा सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम झाला.
शेवटच्या दिवशी नेत्र तपासणी व उपचार, दंतरोग व स्त्री रोग तपासणी तसेच रक्तदाब तपासणी करण्यात आली. डॉ. केशव लोणकर यांनी ही तपासणी केली. स्त्री रोग तपासणी डॉ. अर्पिता जयस्वाल तसेच दंतरोग तपासणी डॉ. अर्पण जयस्वाल व शरद पवार दंत महाविद्यालय सावंगी मेघे च्या चमूनी केली.
नेत्र तपासणी नेत्रतज्ज्ञ डॉ. विनोद अदलखिया व डॉ. नेत्रा जायस्वाल यांनी केली. यात दृष्टीदोष असलेल्या रूग्णांना शस्त्रक्रिया विनामुल्य करून देण्याची व्यवस्था डॉ. अदलखिया यांच्या वर्धा येथील नेत्रा दवाखान्यात करण्यात आली. जेष्ठ नागरिक समितीचे संयोजक सुरेश जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले.
संचालन एम.बी. महाकाळकर व अरविंद उईके यांनी केले. आयोजनासाठी श्रावण मकरंदे, खेमराज शेटे, गजानन मकरंदे, वसंतराव खोडके, वसंतराव राऊत, चावरे, रामदास रेवतकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Health Camp for Youth and Meetings