शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या संगणकीय सेवा ग्राहकांना डोकेदुखी

By admin | Updated: April 30, 2016 02:22 IST

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना जलद व उत्तम सेवा मिळावी यादृष्टीने बँक कार्यालयात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे.

व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : खातेदार ताटकळतपुलगाव : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांना जलद व उत्तम सेवा मिळावी यादृष्टीने बँक कार्यालयात अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे. संगणक प्रणालीचा वापर करण्यात होत असला तरीही सततच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांची कामे खोळंबतात. येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील साधनांना नादुरुस्तीक्चे ग्रहण लागले आहे. त्यामुळे कामे जलद होण्याऐवजी ग्राहकांची ताटकळ होत आहे. ग्राहकांच्या वेळेची बचत करण्यासाठी येथे विविध उपकरणे उपलब्ध करून दिली आहे. मात्र या बँक शाखेतील अधिकाधिक साधने बंद आहे. अथवा नादुरुस्त असल्याने ती ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील भारतीय स्टेट बँकेची प्रशस्त इमारत सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. येथे कर्मचाऱ्यांची वाणवा नाही. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या खिडक्या आहे. यामुळे येथील ग्राहक संख्या मोठी आहे. स्थानिक स्टेट बँक शाखेत एटीएम केंद्र, कॉईन मशिन, पासबुक प्रिटींग मशिन, राशी स्थानांतर मशीन यासारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन दिल्या आहे. त्यामुळे ग्राहकांना रांगेत उभे न राहता व वेळेचा अपव्यय होऊ न देता कामे करता येतात. यामागील बँक प्रशासनाचा हेतू निश्चितच चांगला आहे. परंतु आवश्यक वेळी किंवा सणासुदीच्या दिवसात ही यंत्रे तासन्तास बंद असतात. त्यामुळे सेवा सुरू होण्यासाठी खातेधारकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे या सेवेचा खातेधारकांना उपयोग होण्याऐवजी नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गलथान कारभारामुळे खातेधारकांत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होवू नये, त्यांना आर्थिक व्यवहार त्वरीत करता यावे, याकरिता विविध राष्ट्रीयकृत बँकांनी शाखा कार्यालय, रेल्वेस्टेशन येथे एटीएम मशीन दिल्या आहे. पण एटीएमसेवा सुरळीत सुरू आहे किंवा नाही, त्यात रक्कम आहे काय हे पाहण्याची तसदी बँक अधिकारी घेत नसल्याचे दिसते. परिणामी ग्राहकांना केवळ मनस्ताप करुन तिथून परतावे लागते. स्थानिक स्टेट बँकेत लावलेली मशीन काढण्यात आली. त्याऐवजी अ‍ॅटोमॅटीक पासबुक नोंदी करण्याचे यंत्र लावण्यात अले. ही प्रिटींग मशीनही काही दिवसांपासून बंद असल्याने खातेधारकांना नोंदी करण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. याची दखल घेत यंत्रांच्या दुरुस्तीची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)