शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

क्लिष्ट अटीमुळे ‘तो’ उपायही जीवघेणा

By admin | Updated: December 26, 2015 02:19 IST

जंगली श्वापदांचा उच्छांद कमी करण्यासाठी शासनाने काही अटींवर अश्या श्वापदांना मारण्याची परवानगी दिली आहे.

मदतही तुटपुंजी : शेतकरी वर्गापुढे प्रश्नच
आकोली : जंगली श्वापदांचा उच्छांद कमी करण्यासाठी शासनाने काही अटींवर अश्या श्वापदांना मारण्याची परवानगी दिली आहे. पण या श्वापदांना मारण्याची अट क्लिष्ट असल्यामुळे हा उपायही शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसणारा असल्याची ओरड शेतकरी करीत आहे.
आकोली परिसर हा जंगलव्याप्त आहे. मदन, पंचधारा, वडगाव, बोरखेडी व मदना ही धरणे याच परिसरात आहे. त्यामुळे हरीण, रोही, निलगाव, डुक्कर अदी वन्य प्राण्यांना वावर या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. प्राण्याचे कळपच्या कळप जंगलात फिरत असतात. त्यात वाघाचाही संचार असल्यामुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेताकडे वळविला आहे. परिणामी उभी पिके नष्ट होत आहे. कपाशी, तूर, गहू, चना, ऊस या पिकांचा फडशा पाडला जात आहे. वर्षानुवर्शे शेतकरी जंगली श्वापदांचा उपद्रव सहन करीत असल्याने अश्या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकरी करीत होते. यावर निर्णय घेत शासनाने अश्या प्राण्यांना जीवे मारण्याची परवानगी दिली. पण यासाठी ठरवून दिलेली पद्धत मात्र शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याचे शेतकरी सांगत आहे. यामध्ये परावानगी दिल्यानंतर ४८ तासात श्वापदाला बंदुकीने मारणे, श्वापद मारल्यानंतर वनरक्षकाला कळविणे, मृत श्वापदाला पुरविण्याकरिता खड्डा शेतकऱ्यानेच खोदावा अशा अटी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हा उपाय करण्यास धजावत नाही. परिणामी अद्याप एकही परवानगी अर्ज विभागात दाखल नाही. अजूनही अनेक शेतकरी पिकासभोवती तार बांधुन त्यात वीजप्रवाह सोडून शेतीचे संरक्षण करतात. पण हा बेकायदेशीर उपाय जनावरांसह माणसांच्याही जीवावर बेतत आहे. तसेच वनविभागाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. ‘मदत नको पण श्वापद आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कागदपत्र, फोटो देवून मिळणारी मदत हसावे की रडावे अशी असते.
वनविभागाने श्वापदांना मारण्याची पद्धत सोपी करावी. मदतीचे निकष सुद्धा बदलवून मदतीत वाढ करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वनविभागाकडे करीत आहे.(वार्ताहर)