शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगिण विकासासाठी शिवसेना स्वीकारणार सात गावांचे पालकत्व

By admin | Updated: September 21, 2015 02:03 IST

ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात.

पत्रपरिषद : शासकीय योजना कार्यान्वित करणार कारंजा (घा.) : ग्रामीण भागातील विकासासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना सुरू करण्यात येतात. मात्र या योजना कार्यान्वित होत नसल्याने त्या गरजूपर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येते. यामुळे ग्रामीण भाग आजही विकासापासून दूर असल्याचे चित्र पहायला मिळते. तालुक्यातील सात गावांचे पालकत्व घेऊन या गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश देशमुख यांनी दिली.कारंजा तालुक्यातील वाघोडा, सेलगाव (उमाटे), धामकुंड, जुनापाणी भालेवाडी, येनगाव, पिपरी या गावांचे पालकत्व स्विकारणार असून येथे शासकीय योजना कार्यान्वित करीत या योजनांचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना देण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. गावाच्या विकासाकरिता लागणारा निधीची मागणी राज्य सरकारकडे करणार आहे. या सात सर्वांगीन विकासासाठी १५ आॅक्टोबरपासून उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता सदर गावातील सरपंच, कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करण्यात येत आहे. शिवसैनिक आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने प्रकल्प सुरू करणार आहे. या प्रकल्पात हागणदारीमुक्त गाव, सार्वजनिकस्थळी शौचालय बांधणे, दारूबंदीकरिता कार्यक्षम मंडळ स्थापन करणे, प्रलंबित शासकीय योजनांचा पाठपुरावा घेवून योजना मार्गी लावणे, शेतीला पुरक जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करून देणे, शासकीय योजना गरजूपर्यंत पोहचतील याची कआळजी घेणे, गावविकासाच्या कामात अडथळा आणणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार करून गरजुलआ न्याय मिळवून देणे, कारंजा तालुक्यात एस.टी. आगाराची निर्मिती आदी बाबींवर प्रकल्पात काम करण्याचे देशमुख यांनी सांगितले. पत्रपरिषदेत शिवसेना शहर प्रमुख संदीप गाखरे, तालुका प्रमुख प्रकाश घागरे, महिला प्रमुख ज्योती हरणे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)