बोंदुर्णीत वाहतो गावठी दारूचा महापूर

By Admin | Updated: June 4, 2014 23:58 IST2014-06-04T23:58:19+5:302014-06-04T23:58:19+5:30

वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बोंदूर्णी गावाला दारूभट्टय़ांचा विळखा पडला आहे. सकाळपासूनच दारूभट्टय़ांतून निघणारा धूर, मद्यपींचा वावर यामुळे गावाचे धोक्यात आलेले सामाजिक आरोग्य या

The Great Flood of Boom | बोंदुर्णीत वाहतो गावठी दारूचा महापूर

बोंदुर्णीत वाहतो गावठी दारूचा महापूर

वर्धा : वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या  बोंदूर्णी गावाला दारूभट्टय़ांचा विळखा पडला आहे. सकाळपासूनच दारूभट्टय़ांतून निघणारा धूर, मद्यपींचा वावर यामुळे गावाचे धोक्यात आलेले सामाजिक आरोग्य या सर्व प्रकाराला बोंदुर्णीवासीय त्रस्त झाले आहेत. याप्रकारे अवैधरीत्या दारूचा गाळप करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करीत आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यापूर्वी ग्रामस्थांनी वडनेर पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारांकडे तक्रार केली होती; मात्र त्यांच्या तक्रारीला नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखविण्यात आली. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने या दारूविक्रेत्यांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. येथे खुलेआम दारूविक्री होत असल्याने परिसरातील गावांमधील शौकिनही बोंदुर्णीत दारू ढोसायला येतात. यामुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे.
मद्यपींमुळे बरेचदा वादावादी होते. यात ईल शिवीगाळ केली जाते. गावातील महिलांची मोठी कुचंबना होते. त्यामुळे महिला सहसा घरातून बाहेर पडण्यास धजावत नाही. युवतींनाही या मद्यपींकडून वाहक त्रास सहन करावा लागतो.
याशिवाय ही दारू काढताना यात अनेक विषारी पदार्थाचा वापर असल्याने आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. यात सडवा रसायनासोबतच बेशरमचा पाला, तुरटी, तंबाखू, नवसागर टाकले जाते. ही दारू आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. परिणामी गावातील अनेकांना किडनीच्या संबंधित आजाराची लक्षणे दिसून येत आहे.  ही गंभीर समस्या असून याला वेळीच आळा घातला न गेल्यास याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे. वडनेर पोलिसांनी याप्रकारे विषारी पदार्थांंचा वापर करून दारू बनविणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय गावाच्या शिवारात अवैधरित्या दारूचा गाळप करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
 

Web Title: The Great Flood of Boom