शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

एक वाजतापर्यंत चराईस सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

काकडा या गावातील लोकसंख्या १ हजार ५०० च्या आसपास असून या छोट्याशा गावात दहा रुग्ण आढळून आल्याबरोबर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावच प्रतिबंधित केले. त्यानंतर आणखी दोन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या बारावर पोहोचली आहे. अख्खे गावच प्रतिबंधित असल्याने शेतीतील मशागतीचे कामे थांबली आहे. त्यामुळे पिकांच्यावर तण वाढायला लागल्याने पिके धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देकाकडावासीयांना दिलासा : जि.प. अध्यक्षांची अधिकाऱ्यांसह गावाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा (घाडगे) तालुक्यातील काकडा या गावातील कोरोना रुग्णसंख्या दहावर पोहोचताच प्रशासनाकडून संपूर्ण गावच प्रतिबंधित करण्यात आले. गावातील सर्व रस्ते बंद असल्याने शेती मशागतीसह जनावरे चारण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी अधिकाऱ्यांसह गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दुपारी १ वाजतापर्यंत जनावरे चारण्यासाठी सवलत दिली. त्यामुळे काकडावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.काकडा या गावातील लोकसंख्या १ हजार ५०० च्या आसपास असून या छोट्याशा गावात दहा रुग्ण आढळून आल्याबरोबर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावच प्रतिबंधित केले. त्यानंतर आणखी दोन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या बारावर पोहोचली आहे. अख्खे गावच प्रतिबंधित असल्याने शेतीतील मशागतीचे कामे थांबली आहे. त्यामुळे पिकांच्यावर तण वाढायला लागल्याने पिके धोक्यात आली आहे. तसेच दुग्ध व्यवासिकांचे दरारोज अडीचशे ते तिनशे लिटर दूध वाया जात आहे. जनावरांनाही चारापाणी करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.यासोबतच अनेकांच्या घराचे सिलिंडर, किराणा व भाजीपाला संपल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांना मिळताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी या समस्यांबाबत चर्चा करुन अधिकाºयांसह काकडा गाव गाठले. नागरिकांच्या समस्या जाणून घेत दुपारी १ वाजतापर्यंत जनावरे चराईस सवलत देण्यासोबतच सिलिंडर, भाजीपाला, किराणा आदी साहित्य घरपोच देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यात. तसेच गावकऱ्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, गटविकास अधिकारी देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश रंगारी, डॉ. राहुल धारकर, सागर लोहार, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक टोपले, आशा वर्कर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या