शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खासगीसह शासकीय कार्य गांधी विचारातून व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST

खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : विश्व-शांतीचा संदेश देणारी ‘जय जगत’ पदयात्रा वर्ध्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांनी ग्रामोद्योग व ग्रामविकास यावर विशेष लक्ष दिले. गांधीजींच्या स्वप्नातील भारत म्हणजे ग्राम होय; पण सध्या आपल्याला ग्रामोद्योग व ग्रामविकास घडवून आणायचा असेल तर खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.पी. वी. राजगोपाल यांच्या नेतृत्वात गांधी संदेश घेवून येथे आलेल्या ‘जय जगत’ विश्व शांती पदयात्रेचे स्वागत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या पदयात्रेच्या माध्यमातून बापूंच्या शांती, सद्भावना व बंधुभाव हे सूत्र संपूर्ण जगात पोहोचविले जात आहे. राजघाट दिल्ली ते सेवाग्राम पदयात्रेचा एक टप्पा म्हणून ही पदयात्रा वर्धेतील अग्निहोत्री कॉलेज परिसरात शनिवारी सायंकाळी उशीरा पोहचली. तेथे रविवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी येऊन पी. वी. राजगोपाल यांच्यासह सर्व यात्रेकरूंचे स्वागत केले. याप्रसंगी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. गांधी सिद्धांतामध्ये विचार, आचार व प्रचार हे मुळ आहे. विचारासोबत आचरण असले पाहिजे आणि या आचरणातून आपण प्रचार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी १५ आंतरराष्ट्रीय पदचारींसह सुमारे १०० सत्याग्रही व जय महाकाली शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद गिरडकर, अरुण वसू, दत्तात्रय कानस्कर आदी उपस्थित होते.यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण - पी. वी. राजगोपालजय जगत पदयात्रेचा बापूंच्या भूमीत २००० कि.मी. अंतराचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. या यात्रेदरम्यान विविध विषयांवर ठिकठिकाणी चर्चा झाली. येत्या गांधी पुण्यतिथीपर्यंत नॉन व्हायलेंट एकॉनोमी व नॉन व्हायलेंट गर्व्हनन्स या दोन मुद्द्यांवर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा व सेवाग्राम आश्रम येथे विविध तज्ञांसोबत चर्चा होणार असल्याचे याप्रसंगी पी. वी. राजगोपाल यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक