शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी येत्या पाच वर्षात शासकीय इमारती

By admin | Updated: May 11, 2015 01:37 IST

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच सर्व शैक्षणिक सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी ...

वर्धा : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच सर्व शैक्षणिक सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील भाड्याच्या इमारतीत असलेल्या वसतीगृह व शाळाच्या शासकीय इमारती येत्या पाच वर्षात बांधण्यात येतील, अशी ग्वाही आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव यांनी रविवारी वर्धेत दिली. आदिवासी समाजातील मुला व मुलींच्या तीन वसतीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन आदिवासी विकास राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वर्धा शहरातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उमरी (मेघे) येथे ७ कोटी ५० लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या इमारतीत ३७५ विद्यार्थ्यांची सुविधा होणार आहे. ही इमारत सप्टेंबर १६ पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तयार करण्यात येणार आहे. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त एम.पी. कल्याणकर, जिल्हाधिकारी संजय भागवत, प्रकल्पाधिकारी हरिराम मडावी, सार्वजनिक बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, माजी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक टी.एस. गेडाम, नामदेव मसराम, अमित कोवे, अ‍ॅड. मतिराम मडावी आदींची यावेळी उपस्थिती होती. आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासोबतच उच्च शिक्षणासाठी वसतीगृहाच्या शासकीय इमारती नसल्यामुळे भाड्याच्या इमारतीमध्ये सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगताना ना. राजे अम्ब्रीशराव म्हणाले की, शिक्षणाच्या सुविधा निर्माण करीत असताना दर्जा वाढविण्यावरील विशेष भर देण्यात येणार आहे. आदिवासीचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ आदिवासी जनतेनी घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. प्रारंभी ना. राजे अम्ब्रीशराव यांनी उमरी येथील साडेचार एकर जागेवर बांधण्यात येत असलेल्या वसतीगृहाच्या इमारती व येथील सुविधाबद्दल माहिती घेतली. तसेच यावेळी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, उपविभागीय अभियंता गजानन टाके तसेच सराफ व नंदलाल घडीया यांनी त्यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)