शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विकणारा मालामाल तर पिकविणाऱ्यास कवडीमोल दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

नारळी पौर्णिमा म्हणजेच रविवार, २२ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ८०० क्विंटल भाजीपाला विक्रीकरिता आणला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले. भाजीपाला उत्पादकांनाही हमी भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली असून, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला सध्या कवडीमोल भाव मिळत असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी वर्धा येथील बाजारपेठेत जाऊन पाहणी केली असता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या वांगी, टोमॅटो, कोथिंबीर या भाजीपाल्याला दहा रुपये प्रतिकिलो, तर भेंडी, काकडीला प्रतिकिलो ४ रुपये भाव देण्यात आला. एकूणच सध्याच्या परिस्थितीमुळे विकणारा मालामाल, तर पिकविणाऱ्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

वर्धेत येणारा आलू-कांदा जिल्ह्याबाहेरील- वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला येत असला तरी येथे येणारा आलू आणि कांदा जिल्ह्याबाहेरूनच येत असल्याचे सांगण्यात आले. रविवारी वर्धा बाजारपेठेत १५० क्विंटल आलू, तर ८८ क्विंटल कांद्याची आवक राहिली. वर्धा बाजारपेठेतूनच तालुक्यातील इतर बाजारपेठेत आलू व कांदा पाठविला जातो.

१ हजार ०३८ क्विंटल भाजीपाल्याची आवक- रविवारी वर्धा येथील बाजारपेठेत एकूण १ हजार ३८ क्विंटल भाजीपाल्याची आवक राहिली. यात अल्पावधीत नाशिवंत होणारा भाजीपाला ८०० क्विंटल, तर १५० क्विंटल आलू आणि ८८ क्विंटल कांद्याचा समावेश आहे. सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर १७ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत भाजीपाल्याची  विक्रमी आवक होती, हे विशेष.

रविवारी ९० शेतकऱ्यांनी आणला भाजीपाला- नारळी पौर्णिमा म्हणजेच रविवार, २२ ऑगस्टला वर्धा बाजारपेठेत जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण ८०० क्विंटल भाजीपाला विक्रीकरिता आणला होता. परंतु, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्याचे चित्र बघावयास मिळाले. भाजीपाला उत्पादकांनाही हमी भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी आहे.

भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठी मेहनत घेत पिकांचे संगोपन करतात. ते वेळोवेळी विविध किटकनाशकांची उभ्या पिकांवर फवारणी करता. या किटकनाशकांचे दर गत वर्षीच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच खतांचे भाव वाढले आहेत. असे असतानाही सध्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. भाजीपाला पिकाला हमीभाव जाहीर करून त्याला पिकविम्याचे कवच दिले गेले पाहिजे.- बाळकृष्ण माऊस्कर, शेतकरी, नालवाडी.

भाजीपाल्याला मिळालेला भाव (प्रतिकिलो)

वांगी     १० ते ११ रुपयेटोमॅटो    १० रुपयेभेंडी     ४ रुपयेचवळी    १० रुपयेढेमस    १५ ते २० रुपयेपालक    १५ ते २० रुपयेकोथजंबीर    १० रुपयेहिरवी मिरची    २० रुपयेकाकडी    ४ रुपयेपत्ताकोबी     १० ते १२ रुपयेफुलकोबी     १५ ते २० रुपयेदोडके     १० ते १५ रुपये

 

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार