शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

वस्तीत घुसलेल्या साळींदराला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 22:13 IST

अंगावर काटे असलेल्या विचित्र प्राण्याने श्वान मागे लागल्याने सैरावैर पळत नालीत आश्रय घेतल्याचे येथील कृष्णनगर येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटनेची माहिती पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

ठळक मुद्देश्वानांपासून बचावार्थ नालीत घेतला आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगावर काटे असलेल्या विचित्र प्राण्याने श्वान मागे लागल्याने सैरावैर पळत नालीत आश्रय घेतल्याचे येथील कृष्णनगर येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सदर घटनेची माहिती पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या पदाधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या या कार्यकर्त्यांना सदर विचित्र प्राणी साळींदर असल्याचे निदर्शनास आले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला ताब्यात घेऊन जीवदान देण्यात आले. सध्या हा प्राणी पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे.स्थानिक कृष्णनगर भागातील एकता चौक परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास अंगावर काटे असलेला प्राणी श्वानापासून आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैर पळत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी श्वानांना हाकलून लावत त्याबाबतची माहिती तात्काळ पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांना दिली. माहिती मिळताच पिपल फॉर अ‍ॅनिमल्सचे आशीष गोस्वामी, किरण मोकादम, कौस्तुभ गावंडे यांनी घटनास्थळ गाठले. याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्या मदतीने सतत दोन तास केलेल्या प्रयत्नाअंती नालीत आश्रय घेतलेल्या साळींदराला ताब्यात घेण्यात आले. मदत कार्यात कविता व रविकांत बालपांडे, सातपुते, वनश्री आवते, संजय आवते, मोनिका सातपुते, महेंद्र मेश्राम, इंगोले, शार्दूल वंदीले, लकी इंगोले आदींनी सहकार्य केले.साळींदरला सोडणार नैसर्गिक अधिवासातसदर घटनेची माहिती पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांनी उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांना दिली. सदर वन्य जीवाला दिवसाला दिसत नसल्याने व सुरक्षीत जागी सोडणे शक्य नसल्याने यास तात्पुरते पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात ठेवण्यात आले आहे. त्याला वन विभागाच्या अधिकाºयांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री उशीरा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.साळींदरबाबत अनेक गैरसमजसमाजात साळींदर या वन्य प्राण्याबाबत अनेक गैरसमज आहेत. याच्याबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे साळू आपले काटे शत्रूच्या अंगावर फेकते. साळींदर काटे फेकते म्हणजे स्वत:च्या संरक्षणासाठी तो आपल्या अंगावरील काटे एकदम फुलवून वेगाने उलटे धावतो. हे काटे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चक्क साळूचे वाढुन लांब आणि कडक झालेले केस असतात.