शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्यांना प्राधान्य देणार

By admin | Updated: September 18, 2014 23:40 IST

जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्याचे निवेदन सादर केले. यानंतर काटोलकर यांनी शिक्षकांच्या

वर्धा : जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्याचे निवेदन सादर केले. यानंतर काटोलकर यांनी शिक्षकांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. प्रलंबित समस्यांना प्राधान्य देऊन सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी प्राथमिक शिक्षण, शिक्षक व विद्यार्थी हितासंबंधिच्या सर्व कार्याविषयी तत्परता बाळगण्यात येईल ते म्हणाले. या चर्चेत शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळांची गुणवत्ता व दर्जा टिकवून ठेवत पुढे त्यात वाढ करण्याची कृती शिक्षकांकडून करण्याचे सांगितले. तसेच दोन उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिथे कार्यरत आहे. त्यातील एकाला दुसऱ्या शाळेत पाठवावे व जास्तीचे विषय शिक्षक कार्यरत आहेत तेथून त्यांना काढून आवश्यक असलेल्या शाळेत देण्यात यावे, शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ समायोजन करण्यात यावे हा मुख्य व महत्त्वाचा मुद्दा यासह प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवेदनात काही प्रमुख मागण्याचा समावेश केला. यात जि.प. प्राथमिक शाळा, खराशी जिल्हा भंडारा या शाळेत अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी परवानगी द्यावी, सप्टेंबर २००० मध्ये लागलेल्या १९७ शिक्षण सेवकांना मंजुर झालेल्या वरिष्ठ श्रेणीची थकबाकी काढणे, नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षण सेवकांच्या अंशदायी निवृत्ती वेतन कपातीच्या रकमांचा हिशेब देऊन ती रक्कम त्यांचे नवीन जी.पी.एफ. खात्यावर जमा करण्यात यावी, १९८९ पासूनच्या शिक्षकांना स्थायी केल्याचे आदेश द्यावे, आयकर २४ क्यु ची आॅनलाईन कार्यवाही सर्व पंचायत समितीने तात्काळ करण्याबाबत निर्देश देण्यात यावे. या समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत समस्या सोडविण्याचे आश्वासन काटोलकर यांनी शिष्टमंडळास दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, सरचिटणीस गजानन पुरी, कोषाध्यक्ष, जि.प.शिक्षण समितीचे सदस्य वसंत बोडखे, उपाध्यक्ष राजेश वालोकर, कृष्णा देवकर, कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, बुद्धपाल कांबळे, प्रभाकर तुरक, अरुण झोटिंग, सुनिल पावडे, राजेंद्र सोमनकर, सुनील कोल्हे, प्रकाश किटे, संजय नहाते, मनोहर नरसिंगकर, राऊत आदींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)