शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

एकरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: November 30, 2014 23:11 IST

खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना

तहसीलदारांना निवेदन : समुद्रपूर व हिंगणघाट येथील शेतकऱ्यांची मागणी
हिंगणघाट : खरीप हंगामात पावसाच्या लंपडावामुळे हिंगणघाट- समुद्रपूर परिसरातील शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकांची दुबार-तिबार पेरणीला समोर जावे लागले. यामुळे बी-बीयाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागला. तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे एकरी २५ हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली.
सोयाबीनचे संपूर्ण पीक यंदाच्या बेभरवशी पावसाने वाया गेले. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही निघू शकला नाही. यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. काही शोतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक न सवंगता सरळ शेतात गुरे सोडुन दिली. पीकांच्या या स्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारमय गेली. कापसाची लागवडही दोन-तिनदा करण्यात आली. त्यालाही पुरेसे पाणी मिळाले नाही. अपुऱ्या पावसामुळे कपाशी पिकाच्या जमिनीमध्ये भेगा पडलेल्या आहे. पठारी भागातील कपाशीचे पीक तर सुकलेल्या अवस्थेत आहे. अशातच पडलेली थंडी व धुके यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात लाल्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.
अगोदरच विदर्भातील शेतकऱ्यांचे नापिकीमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे लाल्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत म्हणून एकरी २५ हजार रूपये देण्याची मागणी रुपेश लाजुरकर यांच्या सहकार्याने समुद्रपूर व हिंगणघाट परिसरातील शेतकऱ्यांनी येथील तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली. तसेच मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)