शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांचा कनिष्ठ वीज अभियंत्याला घेराव

By admin | Updated: November 6, 2014 02:06 IST

अनियमित भारनियमन आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ बुधवारी अखेर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्याने ...

बोथूडा : अनियमित भारनियमन आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ बुधवारी अखेर शेतकऱ्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्याने व मांडगाव येथील वीज वितरण कार्यालयात कनिष्ट अभियंत्यास घेराव करण्यात आला़ भारनियमन नियंत्रीत करून ‘हायव्होल्टेज’ वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी करीत सुमारे एक ते दीड तास घेराव घातला़ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा राग शांत झाला़भारनियमनाचे वेळापत्रक तयार करावे, सायंकाळी भारनियमन करून हायव्होल्टेज वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी (दि़५) दुपारी मांडगाव, बोथुडा, मनगाव, सुजातपूर, चिंचोली येथील कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी कनिष्ट अभियंत्यास जाब विचारला़ यापूर्वी तक्रारी व निवेदने देऊनही भारनियमन अनियमित होत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते़ यंदा पाऊस विलंबाने व अपूरा आल्याने पिकांना ओलित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे़ यातच वेळी-अवेळी भारनियमन केले जात असल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले़ शेतकऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली़ यामुळे कनिष्ट अभियंता कुंभारे यांनी याबाबत हिंगणघाट उपविभागीय अभियंता शिरसे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ते मांडगाव कार्यालयात दाखल झाले. शेतकऱ्यांच्या मागणीवर त्वरित निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिली़ यावेळी झालेल्या चर्चेत शिरसे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला़ अनियमित भारनियमन, कमी दाबाचा वीज पुरवठा या प्रमुख समस्यांसह लाईनमन वेळेत कर्तव्यावर येत नसल्याने तांत्रिक बिघाड दुरूस्त होत नसल्याचे सांगितले़ खासगी लाईनमनचा आधार घेत खंडित वीज पुरवठा पूर्ववत करावा लागतो, असे सांगितले़ यावरही चर्चा करण्यात आली़ आंदोलकांत सुरेश डांगरी, ईश्वर इंगोले, पाहुणे, हेमंत तवने, बंडू दांडेकर, नारायण पाहुणे, गजानन खोंडेकर, महेश बोरकर आदी शेतकऱ्यांचा समावेश होता़(वार्ताहर)