गीता अन् हरिदास अडकले लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:07+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देशात कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी गोंदूजी टेकाम रा. रामदेवबाबा वॉर्ड आर्वी यांची मुलगी गीता आणि कै. अंबादास गुलाब कौरोती रा. खैरवाडा यांचा मुलगा हरिदास यांचा विवाह निश्चित झाला होता.

Geeta and Haridas get stuck in lockdown in marriage | गीता अन् हरिदास अडकले लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात

गीता अन् हरिदास अडकले लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग पाळत मंगलसोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/ आर्वी : बोटावर मोजण्या इतक्याच वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत वधू-वरासह प्रत्येकाच्या तोंडाला मास्क अन् सोशल डिस्टन्सिंग पाळत लॉकडाऊनच्या काळात आर्वीच्या राणाप्रताप वॉर्डात गीता आणि हरिदास विवाहबंधनात अडकले. या छोटेखाली मंगलसोहळ्यादरम्यान जिल्ह्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देशात कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी गोंदूजी टेकाम रा. रामदेवबाबा वॉर्ड आर्वी यांची मुलगी गीता आणि कै. अंबादास गुलाब कौरोती रा. खैरवाडा यांचा मुलगा हरिदास यांचा विवाह निश्चित झाला होता.
निमंत्रण पत्रिका वितरीत करण्यात आल्या. परंतु, त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे सर्व निकटवर्तीयांसह कुटुंबीयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न उरकविल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. शिवाय उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या मध्यस्तीअंती अतिशय साध्या पद्धतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गीता आणि हरिदासचा विवाह लावून देण्यात आला. यावेळी दीपक मोटवानी, सुधीर जाचक यांची उपस्थिती होती.

Web Title: Geeta and Haridas get stuck in lockdown in marriage

टॅग्स :marriageलग्न