शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सणाच्या दिवसात देवळीत गॅस सिलिंडरचा तुटवडा; नागरिक त्रस्त

By admin | Updated: October 18, 2014 23:42 IST

येथील आर. इंडियन गॅस कंपनीच्या ग्राहकांनी गत आठ ते १० दिवसांआधी सिलिंडरचे पैसे भरून सुद्धा गॅसचे सिलिंडर मिळत नसल्यामुळे गावात गोंधळ माजला आहे. गॅस सिलिंडरच्या गाड्यांचे बील

देवळी : येथील आर. इंडियन गॅस कंपनीच्या ग्राहकांनी गत आठ ते १० दिवसांआधी सिलिंडरचे पैसे भरून सुद्धा गॅसचे सिलिंडर मिळत नसल्यामुळे गावात गोंधळ माजला आहे. गॅस सिलिंडरच्या गाड्यांचे बील फाडून सुद्धा वेळेवर मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे हा तुटवडा निर्माण होवून, ग्राहकांना गॅस सिलिंडर देणे शक्य होत नसल्याचे एजन्सीच्यावतीने सांगण्यात येत आहे. यामुळे सणांच्या दिवसात ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा तुटवडा एजन्सीच्या चुकीमुळे ही जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे याचा शोध जिल्हाधिकारी यांनी घेवून ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. याठिकाणी आर. इंण्डेन नावाची एकच गॅस एजन्सी कार्यरत असून त्यांच्याकडे शहरी व ग्रामीण भागातील सात हजार ५०० गॅस जोडण्या आहेत. तसेच सर्व ग्राहकांना सेवा देणे कंपनीच्या आवाक्याबाहेर ठरत असल्यामुळे हा गोंधळ माजल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे देवळी शहरासाठी या गॅस एजन्सीच्या व्यतिरिक्त दुसरी एजन्सी देण्यात यावी. त्याचप्रमाणे आंजी (अंदोरी) येथील नवनिर्मात इंण्डेन गॅस एजन्सीला कार्यरत करून ग्रामीण भागातील गॅस सिलिंडरचा भार कमी करण्यात यावा अशी मागणी होत आहे.या एजन्सीवर सिलिंडरचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना तसेच लहान उद्योजकांना या एजन्सीच्यावतीने जास्तीच्या दरात सिलिंडरचा पुरवठा करून नियमीत ग्राहकांना डावलल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. या आधी २१ दिवसानंतर सिलिंडर मिळत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी होत नव्हती; परंतु आता वर्षभरात केव्हाही सिलिंडर नेण्याची मुभा असल्यामुळे गर्दी वाढत आहे. कधी-कधी सुट्या असल्यामुळे तसेच बँकेची लींक फेल राहत असल्यामुळे गाड्यांचे बील फाडण्यात उशीर होत असल्याचेएजन्सीच्या वतीने सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)