शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
3
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
4
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
5
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
6
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
7
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
8
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
9
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
10
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
11
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
12
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
13
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
14
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
15
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
16
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
17
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
18
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
19
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
20
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा स्फोट

By admin | Updated: April 10, 2016 02:21 IST

गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री स्वयंपाकाकरिता गॅस पोटविताना गॅसच्या गळतीमुळे सिलिंडरने पेट घेतला.

बरबडी येथील घटना : आगीत घर खाक
समुद्रपूर : गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री स्वयंपाकाकरिता गॅस पोटविताना गॅसच्या गळतीमुळे सिलिंडरने पेट घेतला. आगीच्या भीतीमुळे घरातील लोकांनी बाहेर पळ काढताच सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. आगीत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील बरबडी येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, रामभाऊ बरडे (५५) यांची पत्नी स्वयंपाक कारण्याकरिता स्वयंपाकघरात गेली होती. यावेळी सिलिंडरला रेग्युलेटरपासून झालेल्या गॅस गळतीमुळे आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. आग दिसताच बरडे यांची पत्नी, त्यांची आई व मुले घराबाहेर पडले. ते घराबाहेर निघताच सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले.
या आगीत घरातील १० क्विंटल तूर, ३ पोते गहू, तांदूळ, दाळ, टीव्ही, फ्रीज, कुलर आदी साहित्याचा कोळसा झाला. तर कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे १ लाख २० हजाराचे दागिने व रोख ४० हजार रुपये रोख आगीच्या भक्षस्थानी आले. यात पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
बरडे यांना भूदानचे तीन एकर शेत मिळाले होते. त्याला मदत म्हणून त्यांनी काही शेत भाडेतत्त्वावर घेतले. यातून निघणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. या आगीत घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. आगीची माहिती मिळताच भारत तिजारे, अनिल घोडे, विठ्ठल साबळे, मोहन चिडे, गोपाल वंगल, अरविंद घोडे, अमर बोरकर, राजू तिजारे, राजू बोरकर यांच्यासह गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पण आग आटोक्यात येण्याऐवजी ती वाढतच गेली. संपूर्ण घर कवेत घेतल्यानंतरच आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच तलाठी गजानन गराड यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.(तालुका प्रतिनिधी)