उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा

By Admin | Updated: October 15, 2015 02:33 IST2015-10-15T02:33:23+5:302015-10-15T02:33:23+5:30

डॉ. सुशीला नायर यांनी आरोग्य सेवेचे व्रत घेतले होते. उत्तम आरोग्यासाठी खेळ हा महत्वाचा असला तरी मानसिक व सामाजिक आरोग्य ...

The game is important for good health | उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा

उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचा

बी.एस. गर्ग : महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत क्रीडा स्पर्धा
सेवाग्राम : डॉ. सुशीला नायर यांनी आरोग्य सेवेचे व्रत घेतले होते. उत्तम आरोग्यासाठी खेळ हा महत्वाचा असला तरी मानसिक व सामाजिक आरोग्य उत्तम राखण्याचे कामही खेळाद्वारे साध्य होते. खेळताना खेळाडू वृत्ती जोपासून खेळण्याचे आवाहन महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग यांनी केले.
महात्मा गांधी आरोग्य संस्थेच्या मैदानावर बुधवारपासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत आंतर विभागीय निवड चाचणी स्पर्धा सुरू करण्यात आली. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. के. आर. पातोंड, डॉ. मनीष जैन, डॉ. सतीश शर्मा व क्रीडा शिक्षक गिरीष भोवरे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. सुशिला नायर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी सूतमाळ अर्पण केली. डॉ. पातोंड यावेळी म्हणाले, खेळांच्या या महाकुंभात सहभागी झालेले सहा विभागाचे खेळाडू विविध खेळात आपल्या खेळांचे प्रदर्शन करणार आहे. या सर्वांनी राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकीक वाढवावा तसेच खेळात खेळाडूपणा जोपासावा असे ते म्हणाले.
मैदानावर म.गा.आ.वि. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा खेळाडू निखिल दारोडे याने क्रीडा ज्योत डॉ. बी. एस. गर्ग यांनी दिली. कस्तुरबा विद्या मंदिरच्या बँडपथकावर मार्च पथ झाल्यानंतर निखिल दारोडेने सर्व खेळाडूंना शपथविधी दिला. ध्वजारोहण डॉ. बी.एस. गर्ग यांच्या हस्ते झाले. विभागीय प्रमुख, मार्गदर्शक पंच आदींचा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
विदर्भ, पुणे, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व मुंबई आदी विभागीय संस्थेचे ७५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल आदी मैदानी खेळांचा समावेश होता. स्वागतपर भाषण डॉ. सतीश शर्मा यांनी केले. संचालन डॉ. शर्मा यांनी केले. आभार डॉ. मनीष जैन यांनी मानले. इतरही मान्यवर यावेळी उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: The game is important for good health