शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी चारा व बागायती पिके सुकली

By admin | Updated: May 20, 2015 02:28 IST

नजीकच्या एकपाळा शिवारातील विद्युत पुरवठा गत १० दिवसांपासून बंद आहे.

देवळी : नजीकच्या एकपाळा शिवारातील विद्युत पुरवठा गत १० दिवसांपासून बंद आहे. यामुळे त्या भागातील बागायती पिके आणि बैलांचा हिरवा चारा सुकला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शहर विभागाच्या अभियंत्याच्यास कामचुकार प्रवृत्ती, अरेरावी व नेहमी गैरहजर राहण्याच्या सवयीमुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. तक्रारींची दखल न घेता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. कधी कार्यालयीन बैठकांचे तर कधी विद्युतशी संबंधित तांत्रिक अडचणीचे कारण सांगून ते नेहमीच गैरहजर राहतात, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे येथील कार्यालय बेवारस ठरले आहे. दिवसभार या कार्यालयात कुणीही कर्मचारी हजर राहत नसल्याने समस्यांबाबतची तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभियंता व लाईनमन यांच्यात कामांचे नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. एकपाळा येथील ग्रामस्थांना १० दिवसांपासून काळोखात खितपत जगावे लागत आहे. वीज पुरवठा खंडित असल्याने शेतातील गुरांचा हिरवा चारा, पिके सुकली आहेत. शिवाय गावातही काळोखाचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना चाचपडावे लागत आहे. वेळी-अवेळी खंडित होणारा वीज पुरवठा व भारनियमन यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शहरातील दिवाबत्तीशी संबंधित समस्याही नित्याच्या असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एकपाळा येथील वीज सुरळीत करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)