शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या वादातून मित्राने केला मित्राचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

राजेश गुप्ता आणि सागर शंकर कांबळे (२५) हे दोघेही बाजारात हमालीचे काम करतात. शुक्रवारी ते दोघेही अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान तेथे दोघांमध्ये दारु पिण्याच्या कारणातून वाद झाला. या वादात सागरने राजेशला शिवीगाळ केल्याची माहिती आहे. दोघांमध्येही शाब्दीक वाद झाला. शुक्रवारीच रात्री ते पुलगाव येथे आले. शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सागर आणि राजेशमध्ये पुन्हा वाद झाला.

ठळक मुद्देचाकूने भोसकून हत्या : पुलगाव शहरातील थरार, आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : जुन्या वादातून व्यक्तीच्या पोटावर, गळ्यावर चाकूने वार करीत हत्या करण्यात आली. हरिरामनगर वॉर्ड १२ येथील सिमेंट रस्त्यावर शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दारु पिण्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा गावात सुरु आहे. राजेश उर्फ बाबुलाल गुप्ता (३५) रा. हरिरामनगर असे मृतकाचे तर सागर कांबळे असे आरोपीचे नाव असल्याचे पुलगाव पोलिसांनी सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.राजेश गुप्ता आणि सागर शंकर कांबळे (२५) हे दोघेही बाजारात हमालीचे काम करतात. शुक्रवारी ते दोघेही अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान तेथे दोघांमध्ये दारु पिण्याच्या कारणातून वाद झाला. या वादात सागरने राजेशला शिवीगाळ केल्याची माहिती आहे. दोघांमध्येही शाब्दीक वाद झाला. शुक्रवारीच रात्री ते पुलगाव येथे आले. शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सागर आणि राजेशमध्ये पुन्हा वाद झाला. अमरावती येथे झालेल्या वादाचा वचपा काढून सागरने राजेश गुप्ता यांच्या गळ्यावर, पाठीवर, पोटावर चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ स्थितीत राजेश गुप्ता जमिनीवर कोसळला.रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या राजेशला पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, राजेशचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच ठाणेदार यांच्या पथकातील विवेक बन्सोड, राजेंद्र हाडके, प्रदीप काटे आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव, ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांनी येत बारकाईने पाहणी केली. पोलिसांनी सागर कांबळे याला अटक केली असून त्याने नाल्यात फेकलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.हमालीच्या पैशावरुन होत होता वादमृत राजेश गुप्ता आणि आरोपी सागर कांबळे हे दोघे बाजारात हमालीचे काम करायचे. दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन होते. दोघांमध्ये नेहमीच हमालीच्या पैशाच्या कारणातून वाद व्हायचा. त्यातूनच सागरने राजेशचा काटा काढून त्यास संपविले.

टॅग्स :Murderखून