शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३७ शिक्षण सेवकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; तीन वर्षे वेतनाविना सेवा

By admin | Updated: February 5, 2015 23:14 IST

तीन वर्षांपूर्वी नियुक्त ६४ पैकी ३७ शिक्षण सेवकांना शिक्षणाधिकारी यांनी शिबिर घेत वैयक्तिक मान्यता प्रदान केली़ यामुळे त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला; पण अद्याप

वर्धा : तीन वर्षांपूर्वी नियुक्त ६४ पैकी ३७ शिक्षण सेवकांना शिक्षणाधिकारी यांनी शिबिर घेत वैयक्तिक मान्यता प्रदान केली़ यामुळे त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला; पण अद्याप २७ शिक्षण सेवकांना मान्यता प्रदान करण्यात आलेली नाही़ या शिक्षण सेवकांनाही त्वरित वैयक्तिक मान्यता देण्याची मागणी समितीने केली आहे़६४ शिक्षण सेवकांना वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीने आमरण उपोषण केले़ यानंतर शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्याद्वारे आयोजित वैयक्तिक मान्यता शिबिरात ३७ शिक्षण सेवकांना मान्यता देण्यात आली़ गत तीन वर्षांपासून हे सर्व शिक्षक विनावेतन विघादानाचे काम करीत होते़ त्यांना वेतन मिळावे व त्यासाठी वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करावे, या मागणीसाठी तक्रार निवारण समितीने वेळोवेळी आंदोलने केली. शासनाचे आदेश असताना शिक्षणाधिकारी वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर २ जानेवारी रोजी ६४ शिक्षण सेवकांनी आमरण उपोषण सुरू केले. उपोषणाला शिक्षक आ़ नागो गाणार यांनी भेट देत त्वरित मार्ग काढा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला़ यामुळे शिबिराचे आयोजन करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले़ २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ६४ पैकी ३७ शिक्षण सेवकांना वैयक्तिक मान्यता दिल्याने त्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. उर्वरित २७ शिक्षण सेवकांच्या प्रस्तावातील त्रूटीमुळे त्यांना वैयक्तिम मान्यता देण्यात आली नाही. यामुळे उर्वरित शिक्षण सेवकांनाही वैयक्तिक मान्यता त्वरित प्रदान करावी, अशी मागणी तक्रार निवारण समितीने केली आहे़ अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही अजय भोयर, रमेश टपाले, टोपले व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)