शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

बॅग चोरणाऱ्या चार महिलांना अटक

By admin | Updated: September 30, 2016 02:13 IST

येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना महिलेची बॅग लंपास झाल्याची तक्रार महिलांनी पोलिसांकडे केली.

बसस्थानकावरील पोलिसाकडून तत्काळ कारवाईहिंगणघाट : येथील बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना महिलेची बॅग लंपास झाल्याची तक्रार महिलांनी पोलिसांकडे केली. या तक्रारीवरून येथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ कारवाई करीत संशयित असलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीतील बॅग जप्त करण्यात आली. ही घटना गुरुवारी घडली. उषा तन्ना हातागडे (४५), लक्ष्मी रमेश हातागडे (२५), प्रिया प्रदिप हातागडे (२०) व एका अल्पवयीन मुलगी सर्व रा. रामेश्वरी, रिंगरोड राहाटेनगर, नागपूर अशी अटकेतील महिलांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रानुसार, मंदा गजानन बोरकुटे (२४) रा. सावली (वाघ) या बस स्थानिकावर हिंगणघाट येथे गावात परत जाण्याकरिता आल्या होत्या. दरम्यान सावलीच्या बसमध्ये चढताना तीन वयस्क महिला व एक मुलगी यांनी मंदाच्या हँड बॅगमधून पैशाची पर्स चोरली. पर्समध्ये ५५० रुपये ठेवले होते. ही बाब लक्षात येताच महिलेने बस स्थानकावर येताच येथे कार्यरत पोलीस कर्मचारी दिलीप आंबटकर यांना दिली. त्यांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत या महिलांचा शोध घेतला. दरम्यान या महिला बसस्थानकातून आपल्या प्रवासाकरिता रवाना झाल्या होत्या. त्यांचा शोध घेत पोलिसांना या महिलांना माता मंदिर परिसरात अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवार्ई पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, आर.एम. जंजाळ, दिलीप आंबटकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)