शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पाच मिनिटात तहसीलदारांनी आटोपले स्वच्छता अभियान

By admin | Updated: November 15, 2014 22:52 IST

बालकदिनाचे औचित्य साधून सकाळी अकराच्या दरम्यान तहसीलदार पुष्पलता कुमरे, समुद्रपूर ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र झाडे, नायब तहसीलदार बी. एन. तिनघसे व काही ग्रामपंचायत सदस्य,

समुद्रपूर : बालकदिनाचे औचित्य साधून सकाळी अकराच्या दरम्यान तहसीलदार पुष्पलता कुमरे, समुद्रपूर ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र झाडे, नायब तहसीलदार बी. एन. तिनघसे व काही ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व तहसील कार्यालयाचे कर्मचारी हा सर्व ताफा समुद्रपूर येथील उच्च प्राथमिक शाळा व बालवाडी येथे स्वच्छता अभियानाकरिता पोहोचला. तहसीलदार कुमरे यांनी हातात खराटा घेऊन छायाचित्रे काढण्यापुरती झाडलोट केली. पाचच मिनिटात त्यांचे स्वच्छता अभियान आटोपले. त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगायला सुरुवात झाली आहेच पण तहसील कार्यालताच्या आवारातच कचरा असल्याने आधी कार्यालय परिसराची स्वच्छता करावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तहसीलदारांना सभेला जायचे असल्याचे कारण सांगत त्या तातडीने निघून गेल्या. पाठोपाठ तहसील कार्यालयाचे कर्मचारीही पाच मिनिटाच्या फरकाने रफादफा झाले. वरिष्ठांचे लेखी आदेश आल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांवर अनिच्छेने तसेच छायाचित्रे काढून वृत्तपत्रामध्ये चमकोगिरी करण्यासाठीच स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचे समान्यांमधून बोलले जात आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षरित्या तहसीलदार पुष्पलता कुमरे काम करतात त्या तहसील कार्यालयाच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग व हागणदारी पसरलेली दिसते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वत:च्या कार्यालयापासून परिसर स्वच्छ करून नंतरच गावातील सफाईसाठी येऊन नागरिकांना योग्य संदेश द्यावा असे बोलल्या जात आहे. प्राथमिक शाळा व बालवाडी गेल्या कित्येक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाने व हागणदारीने त्रस्त आहेत. दहेगाव मार्गावरील मुक्ताबाई विद्यालयात जाताना विद्यार्थ्यांना नाकाला रूमाल बांधूनच जावे लागते. रेणुकापूर ते समुद्रपूर मार्गावर दीड किलोमिटर अंतरामध्ये हागणदारी पसरली आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्यांना या हागणदारीमुळे कोठलाच रस्ता सोडलेला नाही. याबाबत प्रशासनाने स्वच्छतेचा निव्वळ देखावा न करता कडक निर्बंध लादून वेळप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेवून गांभीर्याने या बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. परंतु केवळ फोटो काढण्यापुरते सफाई अभियान राबविले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)