शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संचालकासह पाच जणांवर गुन्हा; कारवाई शून्यच

By admin | Updated: February 21, 2017 01:09 IST

स्थानिक औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये एका कामगाराच्या मृत्यू झाला होता.

महालक्ष्मी कंपनी प्रकरण : देवळी पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये एका कामगाराच्या मृत्यू झाला होता. या प्रकरणी देवळी पोलिसांनी उशिरा का होईना संचालकासह पाच व्यक्तीविरुद्ध शनिवारी देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून तीन दिवसांचा कालावधी झाला तरी कारवाईच्या नावावर येथे काहीच झाले नाही. या प्रकरणात कारवाई करण्याकरिता पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. असे असले तरी होणाऱ्या कारवाईकडे जनतेचे लक्ष लागले आहे. देवळी औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये मध्य प्रदेशातील राठी येथील सुनील कोका कुंभरे (२५) हा कामगार कार्यरत होता. दरम्यान ३१ डिसेंबर २०१६ रोजी कंपनीत त्याचा अपघात झाला. या घटनेची तक्रार देवळी ठाण्यात न करता जखमी सुनील कुंभरे याला नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ३ जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. कंपनी व्यवस्थापनाने नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करुन हे प्रकरण पुढील तपासाकरिता ५ जानेवारीला देवळी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पण, कुणावरही गुन्हा दाखल झाला नव्हता. या कंपनीत नेहमी अपघात होऊनही गुन्हे दाखल झाले नव्हते. कामगार संघटनांच्या दबावामुळे कारवाई देवळी : कंपनीत जखमी झालेल्या सुनील कुंभरे मृत्यूप्रकरणही विस्मरणात जाणार काय, असा सवाल कामगार संघटनांनी उपस्थित केला. कामगार व संघटनांचा दबाव वाढू लागल्याने ठाणेदार चंद्रकांत मदणे यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले. लगेच चौकशीला गती देत शनिवारी रात्री पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीजचे संचालक योगेश मंदानी, व्यवस्थापक प्रजावीर आचार्य, कंत्राटदार महेंद्र रॉय, अग्निशमन अधिकारी प्रसाद अनिल कुकेकर, पाळीप्रमुख महावीर शिवलाल पुच्छकर आदींचा समावेश आहे. कामगार मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच सहायक फौजदार युवराज बाभळे यांनी फिर्याद नोंदविली होती.(प्रतिनिधी)प्रकरण दडपण्याचा प्रयत्नमहालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीजने प्रदुषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. कंपनीत नेहमीच अपघात होतात. मात्र ही प्रकरणे बाहेर येऊ दिले जात नाही. कामगाराचा अपघात झाल्यानंतर गुप्तरित्या नागपूरातील खासगी रुग्णालयात भरती केले जाते. वाच्यात केल्यास नोकरीतून काढण्याची धमकी मिळते. अशीही कामगारांमध्ये दबक्या सुरात चर्चा आहे. सहा कामगारांची कधी होणार चौकशी?२ फेब्रुवारी २०१७ ला सहा कामगार जखमी झाले होते. त्यांना तातडीने नागपूरात उपचार करुन प्रकरण गुंडाळण्यात आले. व्यवस्थापनाने या घटनेची तक्रार अद्याप देवळी ठाण्यात केली नाही. मागील एक वर्षात अशी अनेक प्रकरणे दडपण्यात आले, असा आरोप कामगार संघटनांनी केला. यासंदर्भात ठाणेदार मदणे यांना विचारल्यानंतर म्हणाले, अपघातग्रस्त सहा कामगारांची चौकशी सुरू केली. सर्व पुरावे हाती आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.