शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या नर्सरीला आग

By admin | Updated: June 13, 2016 00:30 IST

हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटातील मसाळा नजीकच्या वनविभागाच्या नर्सरीला आग लागली.

हिंगणी वनपरिक्षेत्रातील घटना : पाच एकरातील सागवान खाकआकोली : हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटातील मसाळा नजीकच्या वनविभागाच्या नर्सरीला आग लागली. या आगीत पाच एकरातील सागवृक्ष जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. या नर्सरीत १० ते १२ एकर जागेवर चार वर्षांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली होती. येथील झाडे चांगली बहरली होती. अचानक दुपारी आगीने भडका घेतला. वाळलेले गवत व काडीकचरा पेटल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. सदर बाब मसाळा गावात मुख्यालयी राहणारे वनरक्षक जी.डी. साबळे व ए.वाय. आगोसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षेत्र सहायक राजू तुमडाम यांना माहिती दिली. घटनास्थळी दोन ब्लोअर मशीनसह वन कर्मचारी दाखल झाले. वनरक्षक व्ही. एन. खेलकर, जे.एस. काळबांडे, वनमजूर अरूण मरकाम, अशोक वाटकर, मारोती भांडेकर, शरद सिराम व ग्रामस्थ संजय नरताम, रणजित काकरवास, अंकित राऊत, ठाकरे, राजू उईके यांनी ब्लोअर मशीन व पाण्याने आग नियंत्रणात आणली. वनरक्षक मुख्यालयी नसते तर १०-१२ एकरातील वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.(वार्ताहर)