शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे ‘चिमण्या’ जीवांचा अस्तित्वाचा लढा

By admin | Updated: June 18, 2014 00:20 IST

माळरानातील शेतात उडताना दिसणारे देवचिमण्यांचे थवे आता दृष्टीस पडत नाही. या लहानशा जीवाची कालौघात काहीली होत त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. पूर्वी घराच्या अंगणातही देवचिमण्यांचा वावर होता;

वर्धा : माळरानातील शेतात उडताना दिसणारे देवचिमण्यांचे थवे आता दृष्टीस पडत नाही. या लहानशा जीवाची कालौघात काहीली होत त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. पूर्वी घराच्या अंगणातही देवचिमण्यांचा वावर होता; पण आता सिमेंटच्या जंगलात देवचिमण्या गावात तर नाही; पण जंगलातही अभावानेच दिसतात.देवचिमण्यांच्या संवर्धनाकरिता कुठेही प्रयत्न होत नाही. ही बाब प्रकर्षाने पुढे येत असल्याने वनअभ्यासक कौशल मिश्र यांनी देवचिमण्यांच्या संवर्धनासह जपणुकीचे आवाहन केले आहे. देवचिमण्या कळपाने राहतात. एका कळपात किमान ७० ते ८० चिमण्यांचा समूह दिसायचा. आता एका कळपात २० ते ३० चिमण्यांपेक्षा अधिक देवचिमण्या दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देवचिमण्यांच्या चिवचिवाटाला एक लय असते. त्यांचा लहान आकार, समुहाने जगण्याची पद्धत आगळीच आहे. त्यांच्या अंगणातील आगमनासोबतच गावखेड्यात, शेतात उल्हासाचे वातावरण तयार होत असे. सुगरण गवतावरील ‘बी’ टिपण्यास उतरणारे देवचिमण्यांचे थवे नेत्रसुख देत होते. त्यातून शेतातही सकाळी तसेच सायंकाळी उत्साहाचे वातावरण तयार होत असे. घराच्या अंगणात आलेल्या देवचिमण्यांचे कुटुंबातील लहान मुलांसह सगळ्यांनाच कौतुक होते; पण निसर्गाची लय हरपण्याच्या प्रक्रियेत देवचिमण्यांचे अस्तित्वही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. (कार्यालय प्रतिनिधी)