शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महोत्सवामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होईल

By admin | Updated: October 2, 2016 00:45 IST

भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे देशभक्तीची भावना सामान्य नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी केंद्र सरकारने ‘७० साल आजादी,

रामदास तडस : गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमात देशभक्तीपर चित्रपट महोत्सव वर्धा : भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे देशभक्तीची भावना सामान्य नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी केंद्र सरकारने ‘७० साल आजादी, याद करो कुर्बानी’ या देशभक्तीपर फिल्म महोत्सवाचे सेवाग्राम येथे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे येथील सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल माहिती मिळून देशभक्तीची भावना निर्माण होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी फिल्म महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले. भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयच्या फिल्म समारोह निर्देशालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने सेवाग्राम आश्रमातील शांती भवन येथे आयोजित फिल्म महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानावरून खा. तडस बोलत होते. यावेळी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयंत मठकर, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या अधिनस्त फिल्म समारोह निर्देशालयाच्या उपसंचालक तनू रॉय, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते. तडस म्हणाले, या ऐतिहासिक पावनभूमित महात्मा गांधीनी स्वातंत्र्याची मुर्हुतमेढ रोवली आहे. अशा पावन भूमित देशभक्ती पर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ज्ञात अज्ञात विरांनी देशासाठी बलीदान दिले. त्या शहिदाची आठवण या चित्रपट महोत्सवामुळे येईल. सेवाग्राम आश्रमाचा जगात गांधीच्या नावाने नावलोकिक आहे. या आश्रमाचा भौतिक विकास करण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडा तयार केला असून सेवाग्रामचा विकास करण्यासाठी मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आश्रम प्रतिष्ठाणचे जयंत मठकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून उपसंचालक तनू रॉय यांनी भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतातल्या काही शहरामध्ये अशा देशभक्ती पर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. १५ आॅगस्ट रोजी दिल्ली येथून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्रात सेवाग्राम आश्रमची निवड यासाठी करण्यात आली. या महोत्सवात स्वातंत्र्य संग्राम सेनानीवर आधारित चित्रपट येथे दाखविण्यात येणार आहे. यामुळे देशभक्तीची भावना पुन्हा विद्यार्थ्यांना प्रज्वलीत करण्याची संधी मिळाली आहे. तसेच भावी पिढीला स्वातंत्र्याच्या महानायकांनी जो संघर्ष केला. बलीदान दिले त्याची माहिती नवीन पिढीला होईल असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अनुपमा गुप्ता यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांनी मानले. कार्यक्रमाला संजय इंगळे तिगावकर, अविनाश काकडे आश्रमातील नागरिक, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)