शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भागवत सप्ताहात शेतकरीकन्येचा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

वर्ध्याच्या धोत्रा (रेल्वे) येथील परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांतीधाम येथे भागवत सप्ताहानिमित्त आयोजित रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात राऊत आणि भोयर कुटुंबातील विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी परिवाराच्या एका निर्णयाने कर्जबाजारी होणारे दोन्ही शेतकरी कुटुंबीय आनंदाने गहिवरले.

ठळक मुद्देकृष्णगिरी परिवाराचा पुढाकार : भागवत सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्ध्याच्या धोत्रा येथील शेतकरी कुटुंबातील विवाह सोहळा ठरला. मात्र, दोन वर्षांपासून कर्जाच्या बोझ्यामुळे मुलीचा विवाह कसा करावा, हा प्रश्न पित्यापुढे होता. वर्ध्याच्या धोत्रा (रेल्वे) येथील परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांतीधाम येथे भागवत सप्ताहानिमित्त आयोजित रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात राऊत आणि भोयर कुटुंबातील विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी परिवाराच्या एका निर्णयाने कर्जबाजारी होणारे दोन्ही शेतकरी कुटुंबीय आनंदाने गहिवरले.लग्न सोहळा म्हटले की, आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण आनंदात साजरा करण्यासाठी मुलीचे वडील अक्षरश: आयुष्यभर झिजतात, कर्जबाजारी होतात. वर्ध्याच्या धोत्रा येथील संतोष राऊत यांच्यावर अशीच वेळ आली होती. दोन वर्षांपूर्वी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज थकीत आहे. नापिकी, अशातच मुलीसाठी आलेला निरोप या विवंचनेत असताना काय करावे, हे वडिलांना सुचेनासे झाले होते. कृष्णगिरी धाममध्ये पोहोचले आणि प्रश्नाचे उत्तर सापडले. धोत्रा येथे सद्गुरू परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांती धाम आहे. येथे विमल गुल्हाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याच सोहळ्यात मुलीचे लग्न होईल का, असा प्रस्ताव मुलीच्या वडिलांनी मांडला. यावर ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव गुल्हाणे यांनी तत्काळ होकार दर्शविला. सर्व खर्च स्वीकारत केवळ मुलगा आणि मुलगी घेऊन या, असे सांगण्यात आले. लग्नाची तयारी सुरू झाली.नवरी सजली आणि भागवत सप्ताहाच्या मंडपात पोहोचली. संतोष राऊत यांची मुलगी संगीता आणि अमरावती जिल्ह्यातील एकलासपूर येथील विनायक भोयर यांचा मुलगा रवी हासुद्धा रुख्मिणी स्वयंवरात पोहोचला. रवी ‘कृष्ण’ आणि संगीता ‘रुक्मिणी’ अशापद्धतीने भागवत ऐकायला आलेली मंडळी वºहाडी झाले. याच सर्वांच्या साक्षीने दोघे विवाह बंधनात अडकलेत....तर उद्याचे चित्र नक्कीच बदलेल!सर्वत्र वर्षभर धार्मिक कार्यक्रम होतात. भागवत सप्ताहानिमित्ताने भगवंताने सांगितलेला मार्ग कथेतून सप्ताहात सांगितला जातो. पण, अशा पद्धतीने लग्न सोहळा पार पाडत कृष्णगिरी धामने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इतरांनीही यापासून प्रेरणा घेतल्यास कोणत्याच मुलीचा बाप कर्जबाजारी होत मृत्यूला कवटाळणार नाही. हा संदेश सर्वत्र पोहोचला तर उद्याचे चित्र नक्कीच बदललेले असेल, यातही शंका नाही.

टॅग्स :marriageलग्न