शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची रात्र बाजारात

By admin | Updated: April 30, 2016 02:18 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे ..

वर्धा कृऊबा समिती : व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाववर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे शेतकऱ्यांना रात्र बाजार समितीच्या यार्डवरच काढावी लागत आहे. सकाळी आपल्या गावाहून आलेल्या शेतकऱ्यांच्या साहित्याचे वेळीच मोजमाप करण्याऐवजी येथे व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाव होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकीय मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात आवक वाढली आहे. या तुलनेत येथे असलेले हमाल व मोजमाप करण्याकरिता आवश्यक काट्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सकाळी बाजारात उत्पन्न घेवून आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मोजमापाकरिता रात्र काढावी लागते. शिवाय बाजार समितीत शेतकऱ्यांंच्या मुक्कामाकरिता कुठलीही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात आणलेल्या त्यांच्या उत्पादनावरच झोपावे लागत आहे.(प्रतिनिधी) लिलाव ११ वाजता करण्याची मागणीवर्धा बाजार समितीत आवक वाढत आहे. यामुळे येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास लिलाव झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकून घर गाठणे साईचे होईल. ज्या शेतकऱ्याचे एक किंवा दोन क्विंटल धान्य आहे अशा शेतकऱ्यांना येथे रात्र काढण्याची गरज पडणार नसल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या. काही शेतकरी स्वत:च्या गाडीने येतात. ते काटा होताच निघून जातात. मात्र त्यांच्याकडे अशी सोय नाही त्या शेतकऱ्यांना रात्री हॉल्टींग बस शिवाय पर्याय नसतो. ती बस आठ वाजेपर्यंत असते. कधी वेळेवर रक्कम मिळाल्यास या बसने गेलेल्या शेतकऱ्याला लुटारूंची भीती असते. यामुळे लिलावाची वेळ बदलल्यास शेतकऱ्यांना सोईचे होईल, असे बोलले जात आहे.