शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाहरकतसाठी शेतकर्‍यांची अडवणूक

By admin | Updated: May 19, 2014 23:49 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज नसल्याचे दाखले (नो ड्यू सर्टिफिकेट) देण्यासाठी शेतकर्‍यांची अडवणूक सुरू केली आहे. एक रूपयाही कर्ज बाकी नसताना

सेलू : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज नसल्याचे दाखले (नो ड्यू सर्टिफिकेट) देण्यासाठी शेतकर्‍यांची अडवणूक सुरू केली आहे. एक रूपयाही कर्ज बाकी नसताना त्यांना तसे दाखले दिल्या जात नसल्याने ऐन शेतीच हंगामाच्या तोंडावर त्यांना इतर बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अडचण जात आहे. शेतकर्‍यांनी सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहे. सोसायटीचे काही शेतकरी नियमित कर्जफेड करीत आले तर काही थकबाकीदार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकारी सोसायट्यांना कर्ज पुरवठा होतो व सोसायटी शेतकर्‍यांना देते यात सहकारी सोसायटीला काही टक्के कमिशन मिळते. ही प्रक्रिया आजवर नियमित सुरू होती. सद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली आता तर अवसायनात निघाली. काही शेतकर्‍यांनी आपल्याकडील कर्ज अशाही परिस्थितीत व्याजासह सहकारी सोसायटीला परत केले. कर्ज दिल्याबाबत रितसर पावती घेतली. सातबार्‍यावरून कर्जाचा बोझा उतरवून घेण्याबाबत पत्रही घेतले. सातबार्‍याकडून कर्जाचा बोझा कमीही करून घेतला. सहकारी सोसायटी नव्याने आता कर्ज देवू शकत नाही असे शेतकर्‍यांना माहीत असूनही कर्जफेड करण्याचे प्रामाणिक काम केले. आता राष्ट्रीयकृत बँकेतून पिककर्ज घेण्यासाठी नो ड्यू सर्र्टिफिकेट आणण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेलू शाखेत शेतकरी गेल्यावर त्यांना नो ड्यू सर्र्टिफिकेट देण्यास नकार देण्यात येत आहे. याबाबत शेतकर्‍यांनी आपणाकडे सहकारी सोसायटीच्या कर्जापोटी एक रूपयाही बाकी नसल्याबाबत सांगितल्यावर आपण कर्जाची रक्कम सोसायटीत भरली. ती बँकेला आली नाही. सोसायटी परस्पर आपले कर्ज वसूल करून घेते व बँकेला भरीत नाही असे शेतकर्‍यांना सुनावण्यात येत आहे. असाच प्रकार धानोली येथील शेतकरी शरद भिंगारे यांच्याशी घडला. त्यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम भरूनही त्यांना हेलपाटे मारायला लावले. सदर बाब सदर शेतकर्‍याने प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितल्यावर शाखा व्यवस्थापकाची चर्चा केली. शेतकर्‍यांना सहकारी सोसायटीमार्फत कर्जपुरवठा झाला. त्यामुळे त्यांनी ती रक्कम सोसायटीकडे जमा केली. सोसायटीला याबाबत बँकेने जाब विचारावा शेतकर्‍याला नो ड्यू सर्टीफिकेटसाठी कोणत्या आधारावर अडविता, असा प्रश्न केल्यावर त्याला नो ड्यू सर्टीफिकेट देण्यात आले. शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात बँकेच्या आडमुठ्या धोरणाचा फटका त्याला अधिक वेदना देत आहे. सोसायटी आणि सहकारी बँकेच्या अंतर्गत व्यवहारात त्यांनी स्वत:हून पारदर्शकता आणण्याचे सोडून शेतकर्‍याची अडवणूक केल्या जात आहे. या प्रकारामुळे अनेक शेतकर्‍याकडे सहकारी सोसायटीचा एक पैसाही बाकी नसतांना त्यांना बँकेतून कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र दिल्या जात नाही. यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. या प्रकारामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याचा शेतकर्‍यांना मार्गात अडचण निर्माण केल्या जात असल्याने शेती हंगामाचा प्रश्न शेतकर्‍यांना सतावत आहे.(तालुका प्रतिनिधी)