‘लॉकडाऊन’मुळे रुतला कुटुंबाचा आर्थिक गाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:00:17+5:30

मागील १०९ दिवसांपासून प्रवाशी वाहनांची चाके जागेवरच रुतून आहे. आजही ऑटोचालकांची परिस्थिती जैसे थेच आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या मिळकतीवरही फरक पडला. पण, घरखर्च मात्र, सुरू असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या जवळील पैसे आता संपले आहे. त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, हा यक्षप्रश्न वाहनचालक-मालकांसमोर उभा ठाकला आहे.

family's financial cart stoped due to 'lockdown' | ‘लॉकडाऊन’मुळे रुतला कुटुंबाचा आर्थिक गाडा

‘लॉकडाऊन’मुळे रुतला कुटुंबाचा आर्थिक गाडा

googlenewsNext
ठळक मुद्देऑटोचालकांची व्यथा : साडेतीन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट

लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील खासगी वाहनचालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हासीमा बंद असल्यामुळे जिल्ह्याबाहेर वाहतूक नसल्याने वाहनचालक व मालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कामाशिवाय दाम मिळत नसल्याने चालकांच्या कुटुंबियांचा आर्थिक गाडाच लॉकडाऊनमध्ये रुतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा खरा फटका सर्वसामान्यांना बसल्याचे दिसून येत आहे.
गिरड येथून जाम, कोरा, सिर्सी, खूर्सापार, उमरेड, चिमूर, हिंगणघाट, मोहगांव, मंगरूळ आदी मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणारे जीप, ऑटो , टेम्पो,मिनीबस आदी सुमारे ९० वाहने खासगी प्रवासी वाहतुकीसाठी सकाळी ७ वाजेपासुन सज्ज राहत होती.
प्रवासी वाहतूक करणे हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणून परिसरातील सुमारे दोनशे युवकांनी हा हा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी अनेकांनी बँका, खासगी बँकेकडून वाहने फायनान्स करून घेतल्या. दररोज प्रवासी वाहतूक करून किमान एकाला १ हजार ते दीड हजार रूपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यातून पाचशे ते सातशे रुपयांचा खर्च वजा करून उर्वरित पैसे ते घरी घेऊन जात होते. या उत्पन्नातुन वाहनचालक आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असे. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाकडे बघता २२ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे सर्वच वाहतूक ठप्प झाली.
मागील १०९ दिवसांपासून प्रवाशी वाहनांची चाके जागेवरच रुतून आहे. आजही ऑटोचालकांची परिस्थिती जैसे थेच आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या मिळकतीवरही फरक पडला. पण, घरखर्च मात्र, सुरू असल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांच्या जवळील पैसे आता संपले आहे. त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, हा यक्षप्रश्न वाहनचालक-मालकांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या विवंचनेत ते आहे. शासनाने याचा विचार करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

माझ्यासह अनेक व्यावसायिकांनी ऑटो,जीप, ही वाहने फायनान्सवर कर्जे घेऊन घेतली आहेत. चार महिने उलटले असून ऑटोरिक्षा जागीच उभा आहे. उत्पन्न नसल्याने फायनान्सचे हप्ते भरणे देखील कठीण आहे. त्यामुळे व्याजाचा भुर्दंही सहन करावा लागत आहे
- अतुल बाकडे,
पिपरी फाटा

मी सुशिक्षित बेरोजगार असून १५ वर्षांपासून प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतो आहे. पण, असा वाईट प्रसंग कधीच आला नाही. तीन महिन्यांपासून एका दमडीची पण कमाई नाही. घरखर्च मात्र सुरूच आहे . तो भागवण्याचे वांदे झालेत. शासनाने सकारात्मक भुमिकेतुन अर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे.
- विजय गुंडे,
जिप मालक गिरड

Web Title: family's financial cart stoped due to 'lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.