लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी (वर्धा) : आर्वी शहरातील बाजारपेठेत ५०० आणि १००च्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील अगरबत्ती व्यावसायिकाला वसुलीत या नोटा देण्यात आल्या होत्या.
अभिजित भिवगडे यांनी शनिवारी बाजारपेठेत दहा हजारांच्या अगरबत्तीची उधारी वसुली केली. त्यात एका दुकानदाराने ५०० रुपयांची बनावट नोट दिली. भिवगडे यांनी बँकेत भरणा करण्यासाठी मशीनमध्ये १४ हजार ५०० रुपये टाकले. मात्र, मशीनने पाच वेळा ५०० ची एक नोट बाहेर फेकली. त्यावरून ती बनावट असल्याचे पडताळणीत आढळले.
"बाजारात एका व्यावसायिकाने उधारी वसूल करताना पाचशेची नोट दिली. बँकेत भरणा केला असताना ती बनावट असल्याचे आढळले. बँकेने ती नोट बनावट असल्याने त्यावर लाल क्रॉस मारली. त्यात माझे पाचशे रुपयांचे नुकसान झाले."- अभिजित भिवगडे, अगरबत्ती व्यावसायिक, आर्वी
Web Summary : Counterfeit 500 and 100 rupee notes surfaced in Arvi's market. A shopkeeper gave a fake 500 note during debt collection. The bank machine detected the fake note during deposit. The businessman incurred a loss.
Web Summary : आर्वी के बाजार में 500 और 100 रुपये के नकली नोट पाए गए। एक दुकानदार ने कर्ज वसूली के दौरान 500 का नकली नोट दिया। जमा करते समय बैंक मशीन ने नकली नोट का पता लगाया। व्यापारी को नुकसान हुआ।