शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

माजी पं.स. सदस्याचा मृतदेह आढळला

By admin | Updated: June 2, 2014 01:36 IST

आर्वी पंचायत समितीचे माजी सदस्य बखाराम पांडुरंग अवथळे (८0) रा. खरांगणा ..

आकोली : आर्वी पंचायत समितीचे माजी सदस्य बखाराम पांडुरंग अवथळे (८0) रा. खरांगणा यांचा त्यांच्या घरापासून शंभर फुटावर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. मृतकाच्या अंगावरील जखमांवरुन त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी सकाळी उघड झाली असून या प्रकरणी एकाला चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे. जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल येत नाही तोपर्यंत काहीही सांगणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलीस सूत्राकडून, बखाराम अवथळे यांना दोन पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मासोद मार्गावरील घरी मुलाकडे राहते, तर बखाराम हे खरांगणा वस्तीत राहणार्‍या दुसर्‍या पत्नीकडे राहत होते. शनिवारी दुपारी नित्याप्रमाणे चहा घेऊन ते घराबाहेर पडले ते सायंकाळी घरी परतले नाही. आज सकाळी मासोद मार्गाकडून घराकडे येणार्‍या निर्जन वाटेवर काटेरी झुडपात मृतदेह आढळून आला. यामुळे रात्री त्यांचा शोध घेण्यात आला नसवा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मृतकाच्या शेजारी मृतकाची काठी पडलेली असून पायातील एक जोडा पडून दिसला. मृतदेह पडून असलेले ठिकाण निर्जन व झाडाझुडपांनी वेढले आहे. मृतकाच्या डोक्याला व डोळ्याला माराच्या जखमा तर कानाखाली ओरबडल्याच्या खुना आहे. खरांगण्याचे ठाणेदार के.आय. मिर्झा सहायक उपनिरीक्षक हरीभाऊ राऊत, विनोद इंगोले यांनी घटनास्थळाच्या पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता सामान्य रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांनी संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले असून त्याचे नाव सांगण्यास नकार दिला. प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर येईल असे पोलिसांचे म्हणने आहे. (वार्ताहर)