शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Wardha; वर्ध्याच्या माजी जि.प.सदस्यासह तिघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 15:14 IST

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना संचारबंदीचे उल्लंघन करून तहसीलदारांशी हुज्जत घालणे महागात पडले.

ठळक मुद्दे तहसीलदारांशी हुज्जत आली अंगलटसंचारबंदीचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना संचारबंदीचे उल्लंघन करून तहसीलदारांशी हुज्जत घालणे महागात पडले. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित विजयसिंग ठाकूर, घनश्याम अहेरी आणि स्वप्नील लाड या तिघांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे.प्राप्त माहितीनुसार, कोरोना विषाणू आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मंगळवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्या अनुषंगाने तहसीलदार प्रीती डुडुलकर या आपल्या चमूसह गस्तीवर नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना देत असताना त्यांना तुकाराम मठ परिसरात अमित विजयसिंग ठाकूर, घनश्याम अहेरी आणि स्वप्नील लाड हे अनावश्यक जमाव करून परिसरात बसून असल्याचे दिसून आले. दरम्यान, तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी गप्पा करीत बसलेल्या सर्वांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देत घरात जाण्यास सांगितले असता अमित ठाकूर आणि त्यांच्या मित्रांनी तहसीलदारांशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ करीत शिपाई सुनील मेंढे यांच्याशी वाद करीत त्यांना धक्काबुक्की केली. तहसीलदार या कर्तव्याचे पालन करीत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. तक्रारीवरून तिघांनाही अटक करण्यात आली. बुधवारी तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस