शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचा मुहूर्त ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रारंभी केंद्र, बीट व तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेणे अपेक्षित होते. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षा, शिक्षकांचे प्रशिक्षण व महोत्सवाकरिता निधीची तरतूद आदी कारणांवरून अधिकारी-पदाधिकारी यांच्या बैठका चालल्या.

ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकुलावर आयोजन : कार्यक्रमांवरील अडचणींचे सावट कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जायचा. यावर्षी अधिकारी व पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावी नियोजनात फेब्रुवारी महिना उलटला. अखेर काहींच्या ‘ना’ राजीनंतर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकरिता ६ ते ८ मार्च या तीन दिवसांचा मुहूर्त ठरविण्यात आला असून नियोजनही करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रारंभी केंद्र, बीट व तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेणे अपेक्षित होते.मात्र, शिष्यवृत्ती परीक्षा, शिक्षकांचे प्रशिक्षण व महोत्सवाकरिता निधीची तरतूद आदी कारणांवरून अधिकारी-पदाधिकारी यांच्या बैठका चालल्या. त्यातच ‘तारीख पे तारीख’ ठरविण्यात आल्या. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी आठ दिवसांत महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून महोत्सवाचे नियोजन करण्यात आले. आता ६ ते ८ मार्च या तीन दिवसांत जिल्हा क्रीडा संकुलावर हा महोत्सव होणार आहे.जिल्हा क्रीडा संकुलावर पुरेशा सुविधा नाही तसेच मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा असल्याने या महोत्सवावरील अडचणीचे सावट कायमच असल्याचे दिसून येत आहे.अशी केली आहे व्यवस्थाजिल्हास्तरीय या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये १० सांघिक खेळ, १४ शर्यती, ४ सांस्कृतिक, १ बॅण्ड व १ कवायत अशा ३० खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ७५२ मुले व १ हजार ४० मुली सहभागी होणार आहेत. खेळाडू मुलींची निवास व्यवस्था सेवाग्राम मार्गावरील रमाबाई देशमुख पब्लिक स्कूल येथे करण्यात आली आहे. मुलांच्या निवासाची व्यवस्था बसस्थानकाजवळील महात्मा गांधी विद्यालयात करण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास चितोडा मार्गावरील सेंट जॉन विद्यालयात व्यवस्था करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना निवासाच्या स्थानापासून क्रीडा संकु लापर्यंत नेण्या-आणण्याकरिता स्कूलबसची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निवास व क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. क्रीडा संकुल परिसरात मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्याबाबतही पालिकेला सुचित करण्यात आले आहे. यासह प्रथमोपचार सेवाही उपलब्ध राहणार आहे.