शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या मृत्यूनंतरही विम्यासाठी ११ महिन्यांपासून करावी लागतेय पायपीट; दोष कुणाचा, बँकेचा की विमा कंपनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:05 IST

Wardha : सेलू येथील मेघा बडे यांनी स्थानिक बंधन बँकेच्या शाखेतून सुमारे वर्षभरापूर्वी ६५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज मंजूर करताना बँकेने प्रोसेसिंग फी-बरोबरच विम्याचा हप्ता देखील कपात केला.

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू :
कर्ज घेताना प्रोसेसिंग फी आणि विम्याचे पैसे कपात करण्यात बँका अजिबात वेळ घालवत नाहीत. मात्र, लाभार्थ्याला खऱ्या अर्थाने मदत करण्याची वेळ आली की, कागदोपत्री प्रक्रियेच्या नावाखाली वारसदारांना अक्षरशः बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात, अशीच एक संतापजनक बाब सेलूत समोर आली आहे.

सेलू येथील मेघा बडे यांनी स्थानिक बंधन बँकेच्या शाखेतून सुमारे वर्षभरापूर्वी ६५ हजार रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज मंजूर करताना बँकेने प्रोसेसिंग फी-बरोबरच विम्याचा हप्ता देखील कपात केला. त्यांचा कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनीकडून एक लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. मेघा बडे यांनी दर महिन्याप्रमाणे नियमित १३ हप्ते भरले. मात्र, अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर चित्रच बदलले. आज त्यांच्या मृत्यूला तब्बल अकरा महिने उलटले, तरी त्यांच्या नॉमिनीला विम्याचा लाभ मिळालेला नाही. याकरिता ते बँकेत येरझारा मारत असून, बँकेकडून चालढकल केली जात आहे.

वारसदाराची मागणी, तातडीने न्याय द्या !

"मृत व्यक्ती हा बँकेचा नियमित खातेदार आहे आणि त्याने प्रामाणिकपणे हप्ते देखील भरलेत. विम्याचे पैसेही वेळेवर कपात झाले. मग लाभ मिळवण्यासाठी इतकी पायपीट का?" प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून वारसदाराला विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.

खाते उघडायला लागले दहा महिने !

विम्याची रक्कम प्राप्त करण्यासाठी प्रथम नॉमिनीचे बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याचे यावेळी बँकेकडून सांगण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला तब्बल दहा महिने लागले. या काळात वारसदाराने कागदपत्रांची पूर्तता, वारंवार फेऱ्या आणि अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत अक्षरशः दमछाक सोसली. खाते उघडल्यानंतर उर्वरित कर्जरकमेच्या परतफेडीसंदर्भात वारसदाराकडून लेखी अर्जही घेण्यात आला. त्या प्रक्रियेलाही दीड महिना लोटला. तरीदेखील विम्याची रक्कम अद्याप वारसदाराच्या खात्यात जमा झालेली नाही.

दोष कुणाचा, बँकेचा की विमा कंपनी?

या प्रकरणात नेमका अडथळा कुठे आहे, याबाबत स्पष्टता नाही. बँक प्रशासन आणि विमा कंपनी यांच्यातील समन्वयाचा अभाव की प्रशासकीय ढिलाई? याचे उत्तर कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्ज मंजुरीच्या वेळी तत्परता दाखवणाऱ्या बँका आणि विमा कंपन्या, लाभ देताना मात्र ढेप खातात, असा संतापही व्यक्त होत आहे.

"आमच्या बँकची सगळी प्रोसेस झाली आहे. आता इन्शुरन्स कंपनीचा विषय आहे. विम्याचा लाभ नेमका कधी मिळणार हे सांगता येणार नाही."
- खुशाल बलकी, एरिया मॅनेजर, बंधन बैंक, सेलू,

English
हिंदी सारांश
Web Title : Family Struggles for Insurance Claim After Woman's Death; Bank's Fault?

Web Summary : Despite premium payments, a woman's family in Selu faces 11-month delay in receiving insurance after her death. The bank's slow processes and coordination issues with the insurance company are causing distress, raising questions about accountability and justice for the nominee.
टॅग्स :bankबँक