शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

३.६६ लाख क्विंटल तुरीचे होणार उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळी वातावरणादरम्यान काही प्रमाणात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला.

ठळक मुद्देपीक कापणीला वेग : ढगाळी वातावरणामुळे अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या पीक कापणीच्या कामाला गती दिली जात आहे. असे असले तरी गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सुमारे ३.६६ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होईल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. मात्र, उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळवा अशी अपेक्षा तूर उत्पादकांना आहे.शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळी वातावरणादरम्यान काही प्रमाणात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर ढगाळी वातावरण जिल्ह्यातून हटल्याने या किटकाचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र, मागील तीन दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. हे काही दिवस पुढे असेच कायम राहिल्यास शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव तूर पिकावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काही शेतकºयांकडून तूर पीक कापणीच्या कामाला गती दिली जात आहे. यंदाच्या वर्षी हेक्टरी सहा क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.६१ हजार हेक्टरवर तुरीची लागवडमागील वर्षी ६० हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. तर यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. सरासरी प्रती हेक्टर ६ क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. प्रती हेक्टर सहा क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी ढगाळी वातावरण हटल्यावरच पिकाची कापणी करावी. त्यामुळे संभाव्य नुकसान टळेल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरी