शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वर्ध्यात वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी अभियंता भावंडानी कसली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 15:24 IST

बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.

ठळक मुद्देखरबुजाच्या पिकाने जीवनातही आला गोडवाशेतीतील प्रयोग इतरांसाठी ठरतेय प्रेरणादायी

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शेतकरी पित्याने दोन्ही मुलांना चांगले संस्कार देत शिक्षणासाठी शेतात रक्त आटवले. मुलांना उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता कर्ज काढून वेळोवेळी प्रोत्साहन दिले. पित्याची ही धडपड पाहून मुलांनीही अभियांत्रिकेची पदवी मिळविली. त्यानंतर नोकरीकरिता प्रयत्न केले पण, नोकरी मिळाली नाही. दोन्ही भावंडांना वडिलांवरील कजार्ची नेहमीच चिंता असायची. म्हणून बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरत खरबुजाची (डांगर) शेती पिकविली आहे.रजत पुरुषोत्तम उईके व शुभम पुरुषोत्तम उईके, असे या कर्तबगार भावंडाचे नाव आहे. त्यांचे वडील पुरुषोत्तम धोंडुजी उईके हे हिंगणघाट तालुक्याच्या जांगोना या गावातील रहिवासी आहे. त्यांच्याकडे दहा एकर शेती असून त्यातील पाच एकरामध्ये ओलीताची सोय आहे. या दहा एकराच्या भरोवशावरच पुरुषोत्तम उईके यांनी पाच सदस्यांच्या कुटुंबाचा सांभाळ केला. शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी रजत आणि शुभमला शिकविले. त्यांच्या शिक्षणात कुठेही खंड न पडू देता वेळोवेळी कजार्ची उचल करुन दोघांना अभियंता बनविले. थोरला रजत हा सिव्हिल इंजिनिअर तर धाकटा शुभम हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला. आता नोकरीकरुन वडिलांना आधार देण्यासाठी इतर युवकांप्रमाणेच यांनीही मोठ्या शहराकडे धाव घेतली. पण, बेरोजगारीच्या या वावटळीत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी तडख आपले गाव गाठून आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. गावात आल्यानंतर घरच्यांना हा निर्णय सांगून दुसºया दिवशीपासून शेतात राबायला सुरुवात केली. जे पीक गावातील इतर शेतकरी घेत नाही व आतापर्यंत घेतलेले नाही ते पीक घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. अडीच एकरात खरबुजाची लागवड करीत त्यातून आता एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहे. या भावंडांच्या या प्रयत्नाला यश आल्याने जीवनातही गोडवा निर्माण झाला आहे.शेतातील झोपडीत ठोकला मुक्कामरजत आणि शुभम या मुलांची शेतीत साथ मिळाल्याने वडिलांनाही मोठा आधार मिळाला आहे. त्यांनी खरबुजाची लागवड केल्यापासूनच शेतातच झोपडी टाकून तेथे मुक्काम सुरु केला आहे. आता जैविक खरबुजाचे पिक चांगलेच बहरल्याने या भावंडाची मेहनत फळाला आली आहे. अडीच एकारातून एक दिवसाआड दीड टन खरबूज निघत असून ते बाजारभावानुसार सरासरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे विकले जात आहे. खर्चवजा जाता त्यांना ३५ हजार रुपये मिळत आहे. या पिकातून त्यांना २० ते २२ टन उत्पादनाचा अंदाज असून यातून खर्चवजा जात ५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.लॉकडाऊनमध्ये होम डिलेव्हरीकोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने भाजीपाला व फळे विकण्यारिता उत्पादकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रजत व शुभमलाही खरबूज विकण्यासाठी अडचणी जात आहे. मात्र, त्यांनी आपल्या शिक्षणाचा वापर करीत कल्पकतेच्या सहाय्याने ह्यहोम डिलेव्हरीह्ण हा पर्याय शोधून काढला. खरबुजाची व्यवस्थित पॅकींग करुन ते घरोघरी पोहोचविले जात आहे. यासोबतच त्यांनी वध्यार्तील मगनसंग्रहालयासमोर कारमध्येच दुकान थाटून विक्री चालविली आहेबेरोजगारीची समस्या असल्याने नोकरी मिळणे सहज शक्य नाही. अशातच नोकरीच्या प्रतिक्षेत वेळ घालविण्यात काही अर्थ नसल्याने आम्ही दोन्ही भावंडांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. खरबुजाची लागवड करुन एका दिवसाआड ४० ते ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यातून वडीलांनी आमच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आम्ही फेडणार आहे.- रजत पुरुषोत्तम उईके, युवा शेतकरी.

टॅग्स :agricultureशेती