शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी अपंगांचे शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे

By admin | Updated: September 24, 2014 23:40 IST

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना यांनी विविध मागण्यांचे निवेदन जि. प. शिक्षणाधिकारी रवीन्द्र काटोलकर यांना सादर केले. यात प्रामुख्याने अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या,

वर्धा : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना यांनी विविध मागण्यांचे निवेदन जि. प. शिक्षणाधिकारी रवीन्द्र काटोलकर यांना सादर केले. यात प्रामुख्याने अपंग कर्मचाऱ्यांच्या बदल्या, समायोजन अथवा पदस्थापना आदी मागण्यांचा समावेश आहे. यासह अपंग कर्मचाऱ्यांकरिता स्वतंत्र विभाग आणि सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करण्याची मागणी केली.यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने काटोलकर यांची भेट घेऊन विविध मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पदग्रहणानिमित्त काटोलकर यांचा सत्कार करण्यात आला. या निवेदनानुसार, शासन निर्णयानुसार अपंग कर्मचाऱ्यांची बदली, समायोजन अथवा पदस्थापना यासारख्या स्थानांतरण प्रक्रियेतून पूर्णत: वगळणे याबाबत चर्चा केली. यासह सामान्य प्रशासन विभागाचे पत्र क्र. ई.एस.टी. २६ मार्च १९९७ नुसार अपंग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात कर्तव्यावर न लावणे याचाही उल्लेख करण्यात आला. अपंग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र विभाग व प्रवर्गवार सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. यामुळे प्रशासकीय गोंधळ टळेल. तसेच ही यादी तयार करुन त्याची प्रत संघटनेला देण्याची मागणी करण्यात आली. यासह ७ फेब्रुवारी १९९६ पासून परिगणना करून तात्काळ अपंगाचा अनुशेष भरण्यात यावा, जिल्ह्यातील ज्या विभागात दोन उच्चश्रेणी मुख्याध्यापक कार्यरत आहेत तेथील शैक्षणिक कार्र्याविषयक बऱ्याच समस्या उत्पन्न झाल्या असून याची तातडीने चौकशी निर्णय घेण्यात यावा. पदोन्नत व पदावनत झालेल्या पदवीधर शिक्षकांबाबत त्वरित निर्णय घेतला जावा. भरारी पथकाच्या माध्यमातून शिक्षकांच्या मनात दहशत निर्माण होईल असे कृत्य टाळावे आदी मागण्यांचा यात सहभाग होता. या मागण्यांचा आढावा घेऊन निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष संजय वाढवे, सचिव प्रवीण हाडे, कोषाध्यक्ष संतोष चांदेकर, सुनील नन्होरे, रवी सारसर, उपाध्यक्ष संदीप ढाले, गजानन धानकुटे व पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)