शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

सात दिवसाचा आठवडा असतानाही शासकीय कामाकरिता नागरिकांना उंबरठे झिजवावे लागतात. अशा स्थितीत राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. यात कामकाजाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता कार्यालय उघडल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर्यत सुरू राहणार आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात ९.४५ वाजतापासून ६.१५ पर्यंत उपस्थित राहून कर्तव्य पार पाडायचे आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’ने घेतला आढावा : पाच दिवसांच्या आठवड्यानंतरही कर्मचारी सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्या आठवड्याच्या कामकाजाचा सोमवारी पहिला दिवस असल्याने जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये निवडक कार्यालयाला भेटी देऊन ‘लोकमत’ने आढावा घेतला. त्यादरम्यान नव्या वेळेनुसार कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच ‘पंचा’ईत झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पहिल्या दिवशी कार्यालय वेळेत उघडले तरी अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहोचले नसल्याचेच चित्र दिसून आले.सात दिवसाचा आठवडा असतानाही शासकीय कामाकरिता नागरिकांना उंबरठे झिजवावे लागतात. अशा स्थितीत राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. यात कामकाजाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता कार्यालय उघडल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर्यत सुरू राहणार आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात ९.४५ वाजतापासून ६.१५ पर्यंत उपस्थित राहून कर्तव्य पार पाडायचे आहे. यामध्ये दुपारी १ ते २ वाजतादरम्यान अर्ध्यातासाचा भोजन अवकाश आहे. या नवीन वेळेनुसार कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळेच ‘लोकमत’च्या चमूने पहिल्याच दिवशी सकाळी ९ वाजता तालुक्यातील निवडक कार्यालय गाठून परिस्थिती जाणून घेतली असता बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची नव्या आठवड्यातही जुन्या वेळेची सवय सुटलेली नसल्याचे दिसून आले. शिपायांनी कार्यालय वेळेवर उघडले मात्र, अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत पोहोचलेच नाही. काही कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सर्वांना सूचना दिल्याने कार्यालय प्रमुखांसह इतर कर्मचारीही कार्यालयात उपस्थित झाल्याचेही निदर्शनास आले.सात तालुक्यांतील पंधरा कार्यालयांवर ‘वॉच’च्लोकमच्या तालुकास्तरावरील प्रतिनिधींनी त्यांच्या तालुक्यातील एक किंवा दोन शासकीय कार्यालयाला भेटी देत पाच दिवसाच्या आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवसाची परिस्थिती जाणून घेतली. यामध्ये वर्ध्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, देवळीत तहसील कार्यालय, नगरपालिका, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती, आर्वी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जलसंपदा सिंचन विभाग, समुद्रपूर तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व पंचायत समिती, हिंगणघाटमध्ये पंचायत समिती, सेलू तहसील कार्यालय व पंचायत समिती आणि आष्टी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला भेट देऊन सकाळी ९ ते १० वाजतापर्यंत कर्मचारी व अधिकाºयांच्या उपस्थितीची माहिती जाणून घेतली.