शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

४८०० शेतकऱ्यांना मार्चअखेर मिळणार वीज जोडणी

By admin | Updated: January 16, 2016 02:35 IST

पाच वर्षांपासून जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीवर वीज जोडणी मिळावी म्हणून वीज कंपनीकडे हजारो रुपये अनामत रक्कम भरली.

प्रशासनाला आदेश : ऊर्जा मंत्र्यांनी दिले लेखी आश्वासनवर्धा : पाच वर्षांपासून जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीवर वीज जोडणी मिळावी म्हणून वीज कंपनीकडे हजारो रुपये अनामत रक्कम भरली. राज्य शासनानेही वीज जोडण्यांसाठी ४० कोटींची तरतूद करून निधी वीज वितरण कंपीला दिला; पण वीज कंपनीने अद्यापही जोडणी दिली नाही. यासाठी महात्मा फुले समता परिषदेसह शेतकऱ्यांनी आंदोलने केली. या आंदोलनांचे फलित म्हणून मार्च अखेरपर्यंत ४ हजार ८०० शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली जाईल, अशी लेखी ग्वाही उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. महात्मा फुले समता परिषदेने विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ४ हजार ८०० अनामत भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळावी म्हणून आंदोलन केले. ३० जानेवारी रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पहिल्यांदा मंत्री म्हणून महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात आले असता त्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी त्वरित वीज जोडणी मिळेल, असे सांगितले. तीन महिन्यांत सर्व ४ हजार ८०० शेतकऱ्यांना वीज जोडणी देऊ, असे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत जाहीर केले होते; पण ही घोषणा पूर्ण झाली नाही. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध आंदोलने करण्यात आली. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडून आढावा घेत ३१ डिसेंबरपर्यंत संपूर्ण वीज जोडण्या देऊ, असे घोषित केले; पण दुसऱ्याच दिवशी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धेतील सभेत वीज वितरण अधीक्षकाच्या सल्ल्याने तारीख बदलून ३१ जुलैपर्यंत देऊ, असे जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम तर गेलाच; पण तारीख पे तारीखमुळे शेतकऱ्यांचे हाल होत होते. शेतकरी आत्महत्यांमध्ये चार लाखांचे कर्ज घेऊन खोदलेल्या विहिरीवर वीज जोडणी नाही, हे एक कारण होते. यानंतर पुन्हा वीज जोडणी न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ जानेवारी २०१६ ला आंदोलन करण्यात आले. वीज जोडणी मिळाली नाही तर सेवाग्राम आश्रमासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा देण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मुंबई मंत्रालयात बोलूवन घेत चर्चा करण्यात आली. यात ३१ मार्च २०१५ पर्यंत वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरलेल्या सर्व ४ हजार ८०० शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१६ पर्यंत वीज जोडणी देण्यात येईल. १ एप्रिल २०१५ ते १२ जानेवारी २०१६ या कालावधीत अनामत भरलेल्या शेतकऱ्यांना १५ आॅगस्ट २०१६ पर्यंत वीज जोडणी देण्यात येईल, असे ना. बावनकुळे यांनी सांगितले. चर्चेच्या वेळी खासदार रामदास तडस उपस्थित होते. याप्रसंगी शंका उपस्थित करण्यात आल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या निवेदनावरच लेखी लिहून देत स्वत:ची स्वाक्षरी केली. त्याचवेळी काम पूर्ण करण्याबाबतच्या सूचना महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे यांना दूरध्वनीवरून देण्यात आल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)