कारंजा तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड
By Admin | Updated: May 18, 2014 23:49 IST2014-05-18T23:49:06+5:302014-05-18T23:49:06+5:30
तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक झाली. यात सहा ग्रामपंचायती भाजप समर्थित तर दोन ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित सत्ता आली आहे.

कारंजा तालुक्यात नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड
कारंजा(घा.) : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक झाली. यात सहा ग्रामपंचायती भाजप समर्थित तर दोन ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित सत्ता आली आहे. तर एक ग्रामपंचायत इतरांच्या हाती गेली आहे. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जाणारी कारंजा येथील १७ सदस्यीय ग्राम पंचायतीवर काँग्रेस समर्थित सत्ता आली आहे. या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून नितीन दर्यापुरकर तर उपसरपंच म्हणून नरेश चाफले हे अविरोध निवडूण आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी.डी.लांजेवार यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेश घुगे यांनी सहकार्य केले. सरपंचपदाच्या मतदानाच्यावेळी ग्रामपंचायतीचे सर्वस सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर जल्लोष साजरा करण्यात आला.(शहर प्रतिनिधी) भालेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंदपदी भाजपा समर्थित कल्पना चोपडे तर उपसरपंचपदी सारंग भोसले अविरोध निवडणून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ताकसांडे यांनी काम पाहिले. काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या हेटीकुंडी येथील सरपंचपदी चंदा योगेश शेंदरे तर उपसरपंचपदी लता सुनील बारंगे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे.एस.श्रीराव यांनी काम पाहिले. भाजप समर्थित असलेल्या किन्हाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शालुु दहिवडे तर उपसरपंचपदी गोवर्धन धारपूरे यांनी वर्णी लागली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी.एस.खिल्लारे यांनी काम पाहिले, वाघोडा येथे सरपंचपदी म्हणून जयमाला गोरे तर उपसरपंच म्हणून शशीभुषण कामडी यांची निवड झाली. येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.बी.सांभारे यांनी काम पाहिले. गवंडी येथे अर्चना किनकर सरपंचपदी तर धनराज बारंगे उपसरपंचपदी निवडून आले. जे. श्रीवास्तव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. चंचोली येथे सरंपच म्हणून किशोर धोटे तर उपसरपंचपदी हेमराज डोंगरे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.ए.लाखे यांनी काम पाहिले. येनगांव येथे वंदना डोंगरे यांची सरपंच म्हणून तर कुसमाकर चोपडे यांची उपसरपंचपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.सी.बर्वे यांनी काम पाहिले. काजळी येथे ललीता चोपडे यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी ओमप्रकाश टोपले यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.व्ही.आदेवार यांनी काम पाहिले.