शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची लागली वाट

By admin | Updated: June 2, 2014 01:39 IST

शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड

वर्धा : शहरांना जोडण्याकरिता उभारण्यात आलेल्या महामार्गावर सर्वाधिक ओव्हरलोड वाहनांनीच वाहतूक होत असून, या ओव्हरलोड ट्रक, कंटेनरच्या वाहतुकीला अद्याप कोणीही प्रतिबंध घातलेला नाही. परिणामी अपघाताच्या प्रमाणात वाढ तर होते, शिवाय रस्त्याचीही पुरती वाट लागत आहे.

ट्रक, कंटेनर, ट्रॅक्टर ही मालवाहू वाहने आहेत. या वाहनांत किती टन माल वाहून न्यायचा याचे प्रमाण ठरलेले असते. चार चाकाच्या ट्रकचे खाली वजन ४ हजार ७0 किलो आणि त्यात माल भरला तर ते वजन ११ हजार ९५0 किलोपेक्षा जास्त नसावे. दहा आणि बारा चाकांच्या रिकाम्या ट्रकचे वजन ६ हजार ७७२ किलो आणि माल भरून २५ हजार किलोपेक्षा जास्त नसावे. १६ चाकांपेक्षा जास्त चाकांच्या रिकाम्या ट्रेलरचे वजन १५ हजार आणि माल भरलेले असेल तर ३१ हजार २00 किलोपेक्षा जास्त नसावे, असे प्रमाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ठरवून दिले आहेत.

महामार्गावर जडवाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहनांत प्रमाणापेक्षा जास्तच माल भरलेला असतो. अतिजड वाहने चालविताना चालकाचे कधी नियंत्रण सुटणार याचा नेम नाही. शिवाय ही वाहने चालविणारे चालक आपली दिशा सोडत नसतात. समोरुन येणार्‍या वाहन चालकालाच आपले वाहन रस्त्याच्या बाजूला न्यावे लागते. परिणामी अपघात घडतात.

रस्ते कितीही मजबूत तयार केले असले तरी ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्याची वाट लागणे निश्‍चितच असते. ओव्हरलोड वाहने रस्त्याच्या दुरवस्थेला कारणीभूत ठरत असली तरी रस्त्याच्या खड्डयांच्या इतर वाहनांनाच अधिक त्रास होतो. त्यामुळे आपल्या मार्गाने गाडी चालवत असतानाही अनेकदा नाहक अपघात घडत असतात.

ओव्हरलोड वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली, तर ही वाहतूक थांबू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. (शहर प्रतिनिधी)