परवान्याकरिता वाहनचालकांची तोबा गर्दी

By Admin | Updated: June 16, 2014 23:38 IST2014-06-16T23:38:33+5:302014-06-16T23:38:33+5:30

येथील विश्रामगृहात महिन्याच्या १० तारखेला वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एक दिवसीय शिबिर घेण्यात येते. या शिबिरात परवाना काढण्यासाठी वाहन चालकांची मोठी गर्दी

Due to the license of drivers, | परवान्याकरिता वाहनचालकांची तोबा गर्दी

परवान्याकरिता वाहनचालकांची तोबा गर्दी

दलालांचा सुळसुळाट : मध्यस्थांमार्फत वाहनचालकांची लूट
समुद्रपूर : येथील विश्रामगृहात महिन्याच्या १० तारखेला वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एक दिवसीय शिबिर घेण्यात येते. या शिबिरात परवाना काढण्यासाठी वाहन चालकांची मोठी गर्दी होत असून परवाना काढून देणाऱ्या मध्यस्थांमार्फत वाहन चालकांची प्रचंड लूट होत आहे.
तालुक्यातील विविध वाहन चालकांच्या सुविधेसाठी जानेवारी २०१४ पासून महिन्याच्या १० तारखेला चालक परवाना देण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी परिसरातील वाहन चालकांना परवान्यासाठी हिंगणघाट येथे जावे लागत होते. येथील वाहन चालकांची परवाना काढण्यासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन समुद्रपूर येथे करण्यात येते; परंतु परवाना काढून देणाऱ्या दलालांचा येथे सुळसुळाट वाढला असून वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. या शिबिरामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहन चालकांना परवाना दिला जातो. यासोबतच अवजड वाहनांचे पासिंग सुद्धा केले जाते. विविध प्रशिक्षण शाळेच्या प्रतिनिधींसह काही दलालांमार्फत परवाना काढून देण्यासाठी शासकीय शुल्कापेक्षा तिप्पट ते पाचपट रक्कम वसूल केल्या जाते. येथे सक्रीय असलेले दलाल वाहनचालकांकडून आवश्यक कागदपत्रे मागवून घेतात. त्या आधारावरावर शिकावू परवाना निघाल्यानंतर एक महिन्यानंतर कायम परवाना देण्यात येतो. विश्रामगृहाच्या छोट्याशा आवारात वाहनचालकांची थातूर मातूर ट्रायल घेण्यात येते. यामुळे विश्रामगृह परिसरात महिन्याच्या १० तारखेला वाहनांची गर्दी होते. परवान्यासाठी वाहन चालकांना उन्हात रांगेत उभे राहावे लागते. संबंधित विभागाने नियमांचे पालन करून वाहनचालकांची आर्थिक लूट थांबविण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to the license of drivers,