शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी शेतातच सडतोय शेतमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही.

ठळक मुद्देनिंबोली (शेंडे) येथील अडीचशे एकरांतील शेतकरी झाले कंगाल

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : पहिल्याच वर्षी निम्न वर्धा धरण १०० टक्के भरण्याचा सर्वाधिक फटका आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या २५० एकरातील पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांचे बॅकवॉटरच्या पाण्याने वहिवाटीचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, तूर शेतातच सडत असल्याचे विदारक वास्तव निंबोली (शेंडे) येथील शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. आता जगावे कसे या विवंचनेत या गावातील शेतकरी सापडला आहे. सोयाबीनच्या गंज्या व कापूस शेतातच सडल्याने यावर्षीचा खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या संकटाला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.निन्म वर्धा धरण यावर्षी प्रथमच शंभर टक्के भरण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. यात धरणाच्या बॅकवॉटरने विशेष म्हणजे जी शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा प्रकल्पाकरिता अधिग्रहीत झाली नाही, अशाही शेतकºयाच्या शेतात बॅकवॉटरचे पाणी शिरल्याने वहिवाटीचे मार्ग पूर्णत: बंद झाले आहे. ५२ टक्केच शेतजमीन शिल्लक आहे. ती जमीन शासनाने घ्यावी, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण ही जमीन पाण्याखाली आल्याने कसण्यायोग्य नाही. त्यामुळे आता करावे काय? व जगावे कसे या विवंचनेत निंबोली येथील शेतकरी सापडला आहे. या बॅक वॉटरच्या पाण्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस शेतातच सडत असल्याचे वास्तव आहे. यातही वहिवाटीचे मार्ग बंद आहे.रबी हंगामासाठी शेतच उरले नाही. शेतीसाठी रस्ता द्या नाही तर उर्वरित शेतजमीन ताब्यात घ्या, अशी मागणी शासनाकडे करीत आहे. येथील ४० शेतकऱ्यांचा २५० एकरांतील सर्व शेतमाल दहा अकरा फूट खोल पाण्यात सडत आहे. शेतात जायला रस्ताच नसल्याने येथील शेतीची कामेही ठप्प आहेत. शेतात पाणी असल्याने या परिसराला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही सोयाबीनच्या गंज्या सडत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. पण शेतात जाता येत नाही. वहिवाटीचा रस्ताच नाही, मग शेतात जावे कसे?पाटबंधारे विभागाने रस्ता बनवून देण्यासाठी वहिवाट देण्याचे मान्य केले होते. मात्र, एक महिन्याचा कालावधी लोटूनही वहिवाटीचे मार्ग तयार न झाल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्ता तयार करून द्या नाहीतर जमीन घ्या, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रस्त्याअभावी या परिसरातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान झाले. त्याची भरपाई कोण देणार? असा सवाल केला जात आहे. शासनाने उर्वरित जमीन घ्यावी अन्यथा वहिवाटीचा पक्का मार्ग द्यावा, अशी मागणी निंबोली (शेंडे) येथील शेतकºयांची आहे. या बॅकवॉटरने खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम मात्र पाण्यात गेल्याचे चित्र आहे.आठ एकरात कपाशी लागवड केली. गेल्या पंधरवड्यापासून शेतातील कापूस फुटून शेत पांढरे झाले आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी मार्गच नाही. दहा फूट खोल पाणी रस्त्यात आहे. शेतात जावे कसे? संबंधित विभागाने पक्का रस्ता द्यावा अन्यथा आमची जमीन घ्यावी. शेतमालाच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी.- अनिल काळे, शेतकरी, निंबोली (शेंडे).ता.आर्वी.अडीच एकरात रबी हंगामातील तूर आहे. मात्र, शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. पाण्यातून मार्ग काढावा लागतो. यात पाण्यामुळे परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. आमच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार?- शिवदास शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे) ता.आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी