लज्जास्पद! वर्ध्यात ६५ वर्षीय वृद्धेवर मद्यपी युवकाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 16:28 IST2022-02-16T16:06:37+5:302022-02-16T16:28:31+5:30

विकृत मानसिकता असलेल्या आरोपी विज्याने कशाचीही तमा न बाळगता महिलेला जबरीने ओढत खेचत परिसरातील टेकडीवर नेले. तेथे तिच्यावर बळजबरी अत्याचार केला अन् तेथेच सोडून देत पळ काढला.

drunk man arrested over rape on 65 year old woman in wardha | लज्जास्पद! वर्ध्यात ६५ वर्षीय वृद्धेवर मद्यपी युवकाचा अत्याचार

लज्जास्पद! वर्ध्यात ६५ वर्षीय वृद्धेवर मद्यपी युवकाचा अत्याचार

ठळक मुद्देआरोपीस ठोकल्या बेड्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : वर्ध्यातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद अशी नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नात्यातीलच एका नराधम युवकाने चक्क ६५ वर्षीय वृद्धेवर बळजबरी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

ही घटना १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रमाईनगर परिसरात असलेल्या टेकडी परिसरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आराेपी विजय वाघाडे (वय ३९) ला अटक केली आहे.

पीडित महिला घरी असताना नातेवाईक आरोपी विज्या मद्यधुंद अवस्थेत तिच्या घरी आला. त्याने तिच्या मुलाला बाहेर नेले. काही वेळाने पुन्हा आरोपी विज्या घरी आला असता महिलेने त्याला माझा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली. तेव्हा आरोपीने तो बाहेर बसून असल्याचे सांगितले.

विकृत मानसिकता असलेल्या आरोपी विज्याने कशाचीही तमा न बाळगता महिलेला जबरीने ओढत खेचत परिसरातील टेकडीवर नेले. तेथे तिच्यावर बळजबरी अत्याचार केला अन् तेथेच सोडून देत पळ काढला. महिला घरी आली असता तिने लगेच रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी विज्याला बेड्या ठोकल्या.

Web Title: drunk man arrested over rape on 65 year old woman in wardha