शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘ड्रॅगन’चा फंडा...लोन, दुप्पट पैशाचा घातला जातोय गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

आता अनेकांकडे ॲण्ड्राॅईड मोबाईल आहेत. मात्र, यातील अनेक ॲण्ड्राॅईड मोबाईलधारकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ‘सायबर क्रिमिनल्स’च्या टोळ्या कार्यरत आहेत. अमूक ॲप डाऊनलोड करा, असे सांगणाऱ्या विविध चिनी ॲप्सची सातत्याने चलती राहते. ‘ड्रॅगन’च्या या ॲप्समधून आर्थिक आमिष दाखवत आतापर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा घातला गेला आहे. अशा फसव्या आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवून लोकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ॲप्सपासून आता मोबाईलधारकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सातत्याने सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. तर सर्वाधिक सायबर क्राईम हे चिनी ॲप्सच्या माध्यमातून होत असल्याचे चित्र आहे. कमी व्याजाने कर्ज, पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष अशा अफलातून फसवणुकीचे नवनवीन फंडे काही  चिनी ॲप्सच्या माध्यमातून होत आहेत. जिल्ह्यात अनेकांना असा गंडा बसला आहे. मात्र, याबाबत फारशा तक्रारी होत नाहीत. यातून अशा घटना ‘रेकॉर्ड’वर येत नाहीत. मात्र, ‘ड्रॅगन’कडून सायबर क्राईमचा विळखा घट्टच होऊ लागला आहे. दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे  गोरगरीब, बहुसंख्येने मध्यमवर्गीयांची मानसिकता खचली आहे. कोरोनामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले. अनेकांना कर्जफेडीची चिंता राहिली. पैशाची चणचण, हाताला काम नाही, यातून आलेल्या अशा गरजूंच्या आर्थिक अगतिकतेचा फायदा तंत्रज्ञानात तरबेज असलेल्या ठग प्रवृत्तींकडून घेतला जातो आहे. आता अनेकांकडे ॲण्ड्राॅईड मोबाईल आहेत. मात्र, यातील अनेक ॲण्ड्राॅईड मोबाईलधारकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ‘सायबर क्रिमिनल्स’च्या टोळ्या कार्यरत आहेत. अमूक ॲप डाऊनलोड करा, असे सांगणाऱ्या विविध चिनी ॲप्सची सातत्याने चलती राहते. ‘ड्रॅगन’च्या या ॲप्समधून आर्थिक आमिष दाखवत आतापर्यंत अनेकांना लाखोंचा गंडा घातला गेला आहे. अशा फसव्या आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवून लोकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ॲप्सपासून आता मोबाईलधारकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. बहुचर्चीत फसव्या ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांनी यातून हातोहात लाखो रुपयांची  कमाई केली. याचा अनेकांना नाहक फटका बसला. विशेष म्हणजे यासाठी कर्ज देणाऱ्या अथवा अमूक एवढे पैसे भरा, लगेच कर्ज देतो, पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखविणाऱ्या अनेक कंपन्या केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. खर तर केवळ रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडे नोंदणी असलेल्या बॅंका किंवा नोंदणीकृत नॉन बॅंकिंग वित्तसंस्थाच कर्ज देऊ शकतात. मात्र, नियम अडगळीत टाकून फसवणुकीचे जाळे टाकणाऱ्या चिनी अॅपच्या मायावी फसव्या भूलभुलैया आता अधिकच गहिरा होत चालला आहे.मात्र, ऑनलाईन क्राईम, सायबर क्राईमचा फटका बसणाऱ्या व्यक्ती जागरुक राहत नाही, यामुळे सायबर भामटे मोकट सुटले आहे. 

ॲप घ्या, पाच मिनिटांत इन्स्टंट कर्ज मध्यंतरी तर एका चिनी ॲपने ॲप डाऊनलोड केल्यापासून काही मिनिटाच्या आत पाच हजारांपासून तर पन्नास हजारापर्यंत कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. तसे एसएमएस आले. मात्र, यासाठी माहिती भरताना ओटीपी मागितला गेला. ओटीपी हातात आल्यापासून जेमतेम मिनिटभरातच अनेकांच्या बॅंक खात्यावरील पैसे काढून घेतल्या गेले. अशा इन्स्टंट लोनची ग्वाही देणाऱ्या ॲप्सपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइन