शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियमांना बगल नको..

By admin | Updated: June 9, 2014 00:03 IST

गत मंगळवारी भाजपचे नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय

नेत्यांनी ठेवावे भान : नियमांचे पालन गरजेचे; चालकांच्याही समस्या घ्याव्यात जाणूनगत मंगळवारी भाजपचे नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले. मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. त्या पार्श्‍वभूमीवर सीट बेल्टसह इतर सुरक्षा व्यवस्थेचा किती काळजीपूर्वक वापर होतो, नेत्यांच्या चालकांना त्यासंबंधीचे कितपत भान असते, येथपासून ते नेतेही त्याबाबत किती बेफिकीर असतात यावर प्रकाशझोत..त्यांच्या जीविताची सर्वांनाच काळजी वाटते म्हणून..!ही काळजी घ्यावेगाचं भान राखा. कायद्याने हलक्या मोटारगाडीवर वेगाचे बंधन नसले तरी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी वेग र्मयादित ठेवा. गाडीत मागे व पुढे बसणार्‍या सर्वांनी सीट बेल्ट बांधावेत. चालकांनी दररोज गाडीच्या इंजिनची पाहणी करावी. जरा जरी संशय आल्यास दुर्लक्ष न करता मेकॅनिकला तत्काळ दाखवावे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका. गाडीतील हवा व ब्रेक सिस्टीमची नियमित तपासणी करावी. महत्वाच्या लोकांच्या ताफ्यातील गाड्यांकडे विशेषत: लहान मुले कुतुहलाने पाहतात. कोणी आडवे येत नाही ना, याची दक्षता घ्या.नेत्यांना काही सूचना.. नेत्यांनी कार्यक्रमासाठी दिलेल्या वेळा पाळल्यास विलंब टाळता येऊ शकतो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमांची संख्या वाढवायची आणि मग पळापळ होते.आपला चालक वेळेत जेवला आहे का, त्याला काही प्रकृतीचा त्रास आहे का, त्याला विश्रांतीची गरज आहे का, हे पाहण्याची जबाबदारी नेत्यांचीच असते.कायम एकच ड्रायव्हर घेण्यापेक्षा त्यांच्या आळीपाळीने ड्यूटी लावल्यास जास्त योग्य.आपण नेते आहोत म्हणून नियम मोडण्यात आपणच पुढाकार घेतो. ते टाळल्यास दुर्घटना टाळल्यास दुर्घटना टाळली जाऊ शकते. रोज आपण किती प्रवास करायचा याचेही बंधन घालून घ्यायला हवे.