शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केळझर गाव गाठून घेतला सेलू तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहिमेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित आढावा सभेत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी लसीकरणाचे काम प्रभावीपणे राबवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीला केल्या. कोरोनाची तिसरी लाट लहानग्यांकरिता धोकादायक ठरण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. त्यामुळेे गावातील ४५ वर्षावरील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कोरोना लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी येथे भेट देत कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार महेंद्र सोनोने, गटविकास अधिकारी पडघम, पंचायत समिती सभापती अशोक मुडे, जि. प. सदस्य विनोद लाखे,सरपंच अर्चना लोणकर,उपसरपंच सुनील धुमोने, आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी, ग्रामविकास अधिकारी सुनील गावंडे आदी उपस्थित होते.येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित आढावा सभेत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी लसीकरणाचे काम प्रभावीपणे राबवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीला केल्या. कोरोनाची तिसरी लाट लहानग्यांकरिता धोकादायक ठरण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. त्यामुळेे गावातील ४५ वर्षावरील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कोरोना लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना दिल्या. सर्वांनी मिशन मोडमध्ये काम करायचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी आशा वर्कर व अंगणवाडी वर्कर्स यांनी चांगले काम केल्याचा उल्लेख करीत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.  येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी यांनी गावात आतापर्यंत ४५ वर्षावरील नागरिकांचे कोरोनाच्या पहिल्या डोसचे ६१ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. या आढावा बैठकीला आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर, ग्रा. पं. सदस्य,पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.पशुवैद्यकीय दवाखान्याकरिता जागेची मागणीगावात पशुवैद्यकीय दवाखाना असून कित्येक वर्षापासून भाड्याच्या खोलीतून दवाखान्याचे कामकाज सुरू आहे. जागा अपुरी पडत असल्याने पशु पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दवाखान्याच्या बांधकामाकरिता निधी मंजूर आहे. परंतु ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे व सरपंच अर्चना लोणकर यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर सकारात्मक विचार करून असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीCorona vaccineकोरोनाची लस