शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वर्धागंज डाक कार्यालयात तोडफोड

By admin | Updated: June 9, 2014 23:46 IST

येथील रेल्वे स्थानकासमोर असलेले वर्धागंज डाक कार्यालय उघडण्याकरिता आलेल्या पोस्ट मास्तरला चार जणांनी मारहाण केली. शिवाय कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना सोमवारी सकाळळी

पोस्ट मास्तरला मारहाण : तिघांना अटक, एक फरारवर्धा : येथील रेल्वे स्थानकासमोर असलेले वर्धागंज डाक कार्यालय उघडण्याकरिता आलेल्या पोस्ट मास्तरला चार जणांनी मारहाण केली. शिवाय कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना सोमवारी सकाळळी ९.१५ वाजता घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एक मारेकरी अद्याप फरार आहे.हे कार्यालय असलेल्या ठिकाणी अनेक अवैध व्यवसाय सुरू असतात. या कार्यालयाच्या वर्‍हांड्यात रात्रीच्यावेळी मद्यपींची मैफल सजत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. अशात पोस्टमास्तर राजेश कांबळे हे सोमवारी सकाळी नित्याप्रमाणे कार्यालय उघडण्याकरिता आले असता त्यांच्यावर काही युवकांनी अचानक हल्ला चढविला. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या कार्यालयात शिरून मारेकर्‍यांनी साहित्याची फेकाफेक केली. मारहाण होत असल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी थेट रेल्वे पोलीस ठाणे गाठले. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून साहित्याची फेकाफेक करीत असलेल्या तिघांना पकडले. तर त्यांच्या सोबत असलेला अन्य एक फरार झाला आहे. या प्रकरणाची तक्रार पोस्टमास्तर कांबळे यांनी शहर ठाण्यात केली. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत याप्रकरणी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. शिवाय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघांना शहर ठाण्याच्या कारागृहात रवाना केले. निलेश रेवनाथ भगत, अरविंद शंकर उईके, राजेश अशोक बरेनवार सर्व रा. गौरक्षणवॉर्ड  अशी आरोपींची नावे असून हे तिघेही धुंदीत असल्याची माहिती ठाणेदार बुराडे यांनी दिली. त्यांची हल्ला करण्याचे कारण समजून आले नसून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)